आज मराठवाडा मुक्ती संग्राम (Marathwada Mukti Sangram Din) दिन आहे. 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या औचित्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी मराठवाड्यासाठी काही घोषणा केल्या.
[read_also content=”पंतप्रधान मोदींवर भाजपच्या नेत्यांसह काँग्रेसकडूनही शुभेच्छांचा वर्षाव https://www.navarashtra.com/india/prime-minister-modi-is-showered-with-wishes-from-bjp-leaders-and-congress-too-nrgm-326889.html”]
‘मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी होऊन आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सर्वच ज्ञात अज्ञात वीरांना त्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दल विनम्रतापूर्वक अभिवादन. असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. त्यांच्या बलिदानातून स्वतंत्र झालेल्या मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून काढू असे आश्वासन देत त्यांनी यावेळी विविध घोषणा केल्या. तसेच मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिबद्दला बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, दुष्काळ कमी झाला पाहिजे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळवले पाहिजे, विकास कामाचा आम्ही वॉर रूम मधून आढावा घेत आहोत. जो काही बॅकलॉक आहे तो भरून काढण्याचं काम करण्यास महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे . मराठवाडा वाटर ग्रीडसह सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचही त्यांनी सांगितलं.
औरंगाबादमधील वेरूळ मंदिरासाठी 136 कोटी
पैठणमध्ये संत उद्यान, पाणीपुरवठा योजना, शिर्डी महामार्ग, क्रीडा संकुल बनवणार
जायकवाडी कालवा दुरुस्ती करणार
मराठवाड्यात पाणी वळवण्यासाठी प्रकल्प
जालना पाणीपुरवठा नूतनीकरण
नांदेड जिल्हा क्रीडा संकुलासाठी निधी देणार
लातूरमध्ये कृषी महाविद्यालय तरतूद
मराठवाडा वाटर ग्रीडमधून लातूरसाठी मान्यता