
महापौर निवडीत लाडक्या बहिणींचा शिंदे पॅटर्न! सामान्य, नव्या उमेदीच्या महिला चेहऱ्यांना संधी
किरण भांगले हे देखील उच्चशिक्षित असून ते इंजिनियर आहेत. महापौर पदासाठी निवड करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणीला प्राधान्य देत। एका सर्वसामान्य कुटुंबातील आदिवासी तरुणीला महापौर पदाची संधी उपलब्ध करून दिली.
ठाणे महापौरपदासाठी देखील शिवसेनेत इच्छुकांची मोठी रांग होती, मात्र होमपीच असलेल्या ठाण्यात देखील एकनाथ शिंदे यांनी प्रस्थापितांना बाजूला सारत नव्या उमेदीच्या आणि नव्या दमाच्या शर्मिला पिंपळोलीकर यांना महापौर पदाची संधी दिली. त्यामुळे ठाण्यात देखील आपल्या गटातील महापौर होईल अशा आशेवर असलेल्या सर्वच प्रस्थापितांचा भ्रमनिरास झाला आहे. उल्हासनगरमध्ये तर शिवसेनेने महापौरपद मैत्रीमध्ये टीम ओमी कलानीच्या नगरसेविका अश्विनी कमलेश निकम यांना दिले आहे. येथे देखील उल्हासनगरचे शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी तसेच त्यांच्या पत्नी राजश्री चौधरी या दोघांनाही महापौर पदाची अपेक्षा होती.