Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunetra Pawar New Deputy CM:  एका दगडात दोन पक्षी! सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून शिंदे बाजूला; देवेंद्र फडणवीसांची ‘अग्निपरिक्षा

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वातील एक गट सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे महाराष्ट्र सरकार आणि राजकारणावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो. कारण सुनेत्रा पवार राजकारणात नवीन आहेत

  • By anuradha sagar
Updated On: Feb 01, 2026 | 09:19 AM
सुनेत्रा पवारच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख

सुनेत्रा पवारच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख

Follow Us
Follow Us:
  • सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याचा निर्णय
  • एकनाथ शिंदे यांच्यासमोरील आव्हाने वाढण्याची शक्यता
  • देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी एक नवीन अग्निपरीक्षा
Sunetra Pawar New deputy CM :    राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी काल  उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या निधनाला चार दिवस उलटत नाहीत तोच सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची इतकी घाई का केली. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यासंदर्भात राजकीय वर्तुळातच नव्हे तर सर्वसामान्य जनतेतूनही हा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. या सगळ्यात  मात्र राज्य सरकारमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे.

सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याचा निर्णय ज्या वेगाने घेण्यात आला ते पाहता भाजपचे केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणावर अप्रत्यक्ष नियंत्रण प्रस्थापित करू इच्छित असल्याचे लक्षण असल्याचे मानले जाते. हे पाऊल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी एक नवीन अग्निपरीक्षा देणारे ठरेल. शिवाय, या हालचालीमुळे येत्या काळात महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरील आव्हाने वाढण्याची शक्यता आहे.

Dupety CM Sunetra Pawar: पवार वारसा आणि राजकीय समीकरणे: सुनेत्रा पवार यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादीला मिळणार नवी दिशा

अजित यांच्या निधनाने बदलली परिस्थिती

दिवंगत अजित पवार यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध होते. म्हणूनच जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदेंनी  प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणतीही कारवाई करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अजित यांनी त्यांचा राजकीय प्रभाव वापरून तो उधळून लावला. अजित पवार  आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील या परस्पर समंजसपणामुळे, भाजपचे केंद्रीय नेतृत्वही त्याच प्रकारे फडणवीसांवर वर्चस्व गाजवू शकले नाही.

केंद्रीय नेतृत्व इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर सातत्याने दबाव  टाकला जातो. पण आता अजित यांच्या आकस्मिक निधनानंतर, केंद्रीय नेतृत्व पुन्हा एकदा फडणवीसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू शकते,  अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Sunetra Pawar Oath Ceremony Live : सुनेत्रा पवारांच्या शपथविधी सोहळ्यात शरद पवार उपस्थित राहणार की नाही? महत्त्वाची माहिती समोर

एकाच वेळी दोन लक्ष्य

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वातील एक गट सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे महाराष्ट्र सरकार आणि राजकारणावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो. कारण सुनेत्रा पवार राजकारणात नवीन आहेत आणि सध्या त्यांच्याकडे अजित यांच्याकडे असलेली राजकीय बुद्धिमत्ता नाही. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वातील हा गट याचा फायदा घेऊन फडणवीसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे.

या गटाने पूर्वी शिंदे यांच्या माध्यमातून राज्याच्या राजकीय बुद्धिबळाचा डाव खेळला होता. आता ते सुनेत्रा यांच्याद्वारे एकाच वेळी दोन लक्ष्यांवर मारा करू इच्छितात, शिंदे यांनाही बाजूला करू इच्छितात. एक अनुभवी राजकीय खेळाडू म्हणून स्वतःची स्थापना करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुढील पाऊल काय असेल हे पाहणे मनोरंजक असेल.

(दिल्लीहून नवभारत लाईव्हसाठी  संतोष ठाकूर यांचा रिपोर्ट)

Web Title: Amit shah super control maharashtra politics eknath shinde devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 09:16 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

‘त्यांनी जुनीच कॅसेट पुन्हा वाजवली!’ शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीवरून एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर पुन्हा निशाणा
1

‘त्यांनी जुनीच कॅसेट पुन्हा वाजवली!’ शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीवरून एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर पुन्हा निशाणा

एकनाथ शिंदेंनी घेतली प्रधानमंत्री मोदींची भेट, दिल्लीतून शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
2

एकनाथ शिंदेंनी घेतली प्रधानमंत्री मोदींची भेट, दिल्लीतून शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्य सरकारकडून कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित; 6.22 लाख खात्यांमध्ये तब्बल ‘इतके’ कोटी जमा
3

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्य सरकारकडून कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित; 6.22 लाख खात्यांमध्ये तब्बल ‘इतके’ कोटी जमा

‘ठाणे कि रिक्षा’ म्हटल्यावर आग लागते मग जरांगेची भाषा मान्य आहे का?’ गुणरत्न सदावर्तेंचा एकनाथ शिंदेंना सवाल
4

‘ठाणे कि रिक्षा’ म्हटल्यावर आग लागते मग जरांगेची भाषा मान्य आहे का?’ गुणरत्न सदावर्तेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.