स्पाइसजेट विमानांचे इमर्जन्सी लॅंडींग
सर्व प्रवासी सुखरूप
मुंबई एअरपोर्टवर घडली घटना
Spicejet Plane Emergency Landing: मुंबई विमानतळावर एक मोठी घटना घडली आहे. स्पाइसजेट विमानाचे आपत्कालीन लॅंडींग करण्यात आले आहे. स्पाइसजेटच्या विमानाने उड्डाण केले आणि उड्डाण केळीवर त्याचे बाह्यचाक निखळले. त्यानंतर या विमानाचे आपत्कालीन लॅंडींग मुंबई विमानतळावर करण्यात आले आहे.
स्पाइसजेट विमानचे चाक उड्डाण केल्यावर हवेतच निखळल्याची घटना घडली. त्यानंतर स्पाइसजेट विमानाचे आपत्कालीन लॅंडींग मुंबई विमानतळावर करण्यात आले आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या विमानाचे सुखरूप लॅंडींग करण्यात आले. या विमानातून प्रवास करणारे सर्व 75 प्रवासी सुखरूप आहेत.
स्पाइसजेटचे विमान कांडला ते मुंबई असे प्रवास करत होते. कांडलावरून मुंबईला येत असताना या विमानाचे चाक निखळले असल्याचे लक्षात आले. त्यानंतर मुंबई विमानतळावर हायअलर्ट जारी केला गेला. अन्य सर्व विमानांची ऑपरेशन्स थांबवण्यात आली. सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आले. त्यानंतर हे विमान रनवेवर सुखरूप उतरवण्यात आले. या घटनेत सर्व प्रवासी व क्रू मेंबर्स सुखरूप असल्याचे समोर आले आहे.
CSMIA ने दिले स्पष्टीकरण
कांडला येथून येणाऱ्या विमानाने तांत्रिक अडचण असल्याची तक्रार केल्यानंतर त्या विमानाने छत्रपती शिवाई महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA ) येथे आज दुपारी 3.51 मिनिटांनी आपत्कालीन लॅंडींग केले. सावधगिरी म्हणून इमर्जन्सी घोषित करण्यात आली होती. विमान रन-वे 27 वर सुरक्षितपणे उतरले. सर्व प्रवासी व कर्मचारी सुरक्षित आहेत. काही काळाने संपूर्ण कामकाज सुरू झाले. सुरक्षितता हेच CSMIA चे प्राधान्य आहे.
प्रवासी थोडक्यात बचावले
कोचीवरुन अबुधाबीला जाणारे इंडिगोचे विमानाने उड्डाण घेतल्यानंतर पुन्हा काही काळाने कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. दरम्यान कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबुधाबीला जाण्यासाठी indigoच्या फ्लाईटने उड्डाण केले. मात्र विमानात गडबड झाल्याने हे विमान पुन्हा कोची विमानतळावर उतरवण्यात आले आहे.
प्रवासी थोडक्यात बचावले! Indigo ची ‘ही’ फ्लाईट चक्क 2 तास…; मध्यरात्री नेमके घडले तरी काय?
कोचीवरुन अबुधाबीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात काहीतरी गडबड झाल्याने हे विमान पुन्हा कोचीत उतरवण्यात आले. पायलट प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता फ्लाईट पुन्हा कोचीत उतरवली. मात्र याधी विमान दोन तास हवेतच घिरट्या मारत असल्याचे समोर आले आहे. अबुधाबीला जाण्यासाठी विमानाने रात्री 12.30 वाजता उड्डाण केले होते. दरम्यान 2.30 वाजण्याच्या सुमारास हे विमान पुन्हा कोचीत लँड करण्यात आले.