Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लालपरीची चाके थांबणार! गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

ST bus workers strike : गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपाच्या पावित्र्यात आहेत. कृती समितीला आश्वासन देऊनही निर्णय न झाल्याने एसटी कर्मचारी संपावर जाणार आहेत. ३ सप्टेंबरपासून संपाचा इशारा दिला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 26, 2024 | 12:38 PM
गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

राज्यभर एसटीचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील एसटी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीची बुलडाणा येथे बैठक पार पडली. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी येत्या 3 सप्टेंबरपासून तीव्र आंदोलन करणार असल्याचे संकेत आज बैठकीत देण्यात आले.

3 सप्टेंबरनंतर गणेशोत्सवाच्या सणाला सुरुवात होत आहे. परिणामी ऐण सनासुदीत प्रवाशांचे हाल होणार की काय असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने आमच्या मागण्या लवकर मान्य कराव्या, असा इशाराही कृती समितीच्या पदाधिका-यांनी दिला आहे.

या आंदोलनाविषयी बोलताना कृती समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली लालपरी हा महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे. वाहतुकीच्या बाबतीत महाराष्ट्र परिवहन मंडळाचा आशिया विभाग पहिल्या क्रमांकावर आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ मिळावी, यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून ही कृती समिती तयार झाली आणि २०१६ पासून आमची मागणी राज्यकर्त्यांपर्यंत आम्ही वेळोवेळी आंदोलन करून पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याचे आश्वासन दिले. मात्र, ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रातील जनतेला न्याय देतानाच त्यांनी कामगारांनाही न्याय द्यावा. वेतन आयोगाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यकाळ जाहीर करून वेतनाप्रमाणे वेतनवाढ करावी, अन्यथा एसटी कर्मचारी कृती समितीच्या माध्यमातून 3 सप्टेंबरपासून तीव्र आंदोलन छेडतील, असे संकेत त्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही, असा आरोप एसटी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन वेतनाचा मुद्दा निकाली काढावा अशी मागणी करण्यात आली.

राज्यभरात आक्रोश आंदोलन

याची दखल घेऊन मागील सात तारखेला कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठक पार पडली. त्यात धोरणात्मक बाबीवर चर्चा झाली. तसेच पुढच्या कॅबिनेटमध्ये कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अजून कुठलीही कृती समितीच्या माध्यमातून आज राज्यभरात आक्रोश आंदोलन पार पडत आहे.

कृती समितीच्या माध्यमातून आक्रोश

एसटी महामंडळ आर्थिक संकटात होते. आता आर्थिक संकटातून बाहेर पडलेले असताना गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांचा करार प्रलंबित आहे. त्या अनुषंगाने विविध पातळीवर मागण्या करण्यात आल्या. परंतु, मागण्यांचा मार्ग मोकळा होत नव्हता. म्हणून कामगार संघटनेच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील श्रमिक संघटनांची एक कृती समिती तयार झाली आहे. त्या कृती समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पातळीवर आंदोलन झाले.

Web Title: St employees gave warning to go on strike ahead of ganeshotsav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2024 | 12:38 PM

Topics:  

  • Ganpati festival 2024
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

देखणे हे रूप दिसे….! शाही थाटात चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आगमन, अनोख्या रूपात बाप्पा साकार
1

देखणे हे रूप दिसे….! शाही थाटात चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आगमन, अनोख्या रूपात बाप्पा साकार

जल्लोषात आणि आनंदात, चैतन्याची फोडा हंडी…! लाडक्या प्रियजनांना पाठवा दहीहंडीच्या शुभेच्छा, वाचून सगळ्यांचं होईल आनंद
2

जल्लोषात आणि आनंदात, चैतन्याची फोडा हंडी…! लाडक्या प्रियजनांना पाठवा दहीहंडीच्या शुभेच्छा, वाचून सगळ्यांचं होईल आनंद

मुरलीच्या स्वरात शांती,कान्हाच्या कृपेत….! गोकुळाष्टमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा ‘या’ भक्तिमय शुभेच्छा
3

मुरलीच्या स्वरात शांती,कान्हाच्या कृपेत….! गोकुळाष्टमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा ‘या’ भक्तिमय शुभेच्छा

Nag Panchmi 2025: नागांचे रहस्य; साप चावल्याने कधी आणि कसा मृत्यू व्हायला पुराणातील दावे
4

Nag Panchmi 2025: नागांचे रहस्य; साप चावल्याने कधी आणि कसा मृत्यू व्हायला पुराणातील दावे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.