
MSRTC NCMC Card
ST News : (४ ऑक्टोबर) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) प्रकल्प तांत्रिक अडचणी, कार्ड वितरणातील गैरसोयी ,प्रवाशांना,व वाहकांना भेडसावणाऱ्या समस्यां अशा विविध कारणांनी अपयशी ठरत असून ही कंपनी हा प्रकल्प हाताळण्यात सक्षम आहे का, याची व निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी अशी मागणी एसटी कामगार काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
१ ऑक्टोबरपासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या निर्णयामुळे प्रवाशांची, व तिकीट मशीन हाताळणाऱ्या वाहकाची मोठी कुचंबणा होत आहे . वाहकाना या प्रणालीचा वापर करताना वारंवार तांत्रिक अडचणी येत आहेत.विशेष म्हणजे, ऑनलाइन तिकीट काढताना संबंधित सवलत अद्याप उपलब्ध असल्याचे निदर्शनास येत असल्याने एनसीएमसी कार्डच्या सक्तीच्या निर्णयाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
एनसीएमसी कार्ड मिळविण्याची प्रक्रिया किचकट असून, कार्ड काढण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे बरगे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर १९९ रुपये किमतीचे कार्ड खाजगी एजंट कडे २५० ते ३०० रुपये दराने विकले जात असल्याच्या तक्रारी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या कथित अतिरिक्त वसुलीची चौकशी करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.
Mira Bhayndar : मिरा-भाईंदरमध्ये स्वयंपुनर्विकासाचा पाया रचणार, आमदार नरेंद्र मेहतांचा पुढाकार
एनसीएमसी प्रकल्प कंत्राटदार कंपनीला देताना झालेली निविदा प्रक्रिया, कराराच्या अटी, अंमलबजावणीची पद्धत या बाबतीत शंका निर्माण होत असून कंपनी खरोखरच सक्षम आहे याची चौकशी करण्यात यावी, असेही बरगे यांनी म्हटले आहे.
प्रवाशांना डिजिटल सुविधा उपलब्ध करून देताना ज्या प्रवाशांकडे एन सी एम सी कार्ड आहे, व कार्ड मध्ये पुरेसा बॅलन्स आहे.पण कार्ड रीड होत नाही.काही प्रवाशांकडे क्यू आर कोड असलेली पावती आहे, मात्र मशीन स्कॅन करीत नाही.काही वेळा रक्कम कट होते.पण तिकीट प्रिंट होत नाही.नेटवर्क व सर्व्हरची समस्या निर्माण होते.व वाहकांना नाहक त्रास होत असून यावर पुरेसा वेळ मिळून सुद्धा मार्ग काढण्यासाठी कंपनी अपयशी ठरत असेल तर अशा प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा फेरविचार करण्याची गरज आहे, अशी मागणी श्रीरंग बरगे यांनी केली आहे.