Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST News : ३ वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची होणार बदली, प्रताप सरनाईक यांचे निर्देश

MSRTC News: एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करा! असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 24, 2025 | 03:39 PM
३ वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची होणार बदली

३ वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची होणार बदली

Follow Us
Follow Us:

मुंबई: एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करा! असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. ते आमदार गोपिचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बोलावलेल्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला आमदार गोपिचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्या सह एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार इतर वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तुम्हाला इतक्या मिरच्या का लागल्या आहेत? सुषमा अंधारेंनी त्याच तालात परत गायली कुणालची कविता

यावेळी बोलताना आमदार पडळकर म्हणाले की, अनेक अधिकारी एकाच मुख्यालयात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसल्यामुळे त्यांचे काही ठराविक कर्मचाऱ्यांशी हितसंबंध निर्माण होतात. त्यातून ते इतर सर्व सामान्य कर्मचाऱ्यांवर अन्याय करतात. याचा विपरीत परिणाम एस टी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर होत आहे. त्यामुळे भविष्यात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी. या मागणीला दुजोरा देत मंत्री सरनाईक यांनी याबाबतचा आढावा घेऊन एसटी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश दिले.

यावेळी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. अधिवेशन संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देता येईल, असा निर्णय घेतला जाईल! असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. दरम्यान संगमनेर (जिल्हा अहिल्यानगर) बसस्थानक परिसरातील समस्या संदर्भात आमदार सत्यजित तांबे व अमोल खताळ यांच्या शिष्टमंडळासमवेत मंत्री सरनाईक यांनी चर्चा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी विस्तारित जागा देणे, नाशिक- पुणे महामार्गा वरुन जाणाऱ्या बसेस संगमनेर बसस्थानका मध्ये थांबवणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

कुणाल कामराच्या स्टुडिओ तोडफोडीनंतर हर्षवर्धन सपकाळ संतापले; नुकसान भरुन देण्याची केली मागणी 

Web Title: St news officers who have been working in the same headquarters for more than three years will be transferred says pratap sarnaik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 03:39 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • ST News

संबंधित बातम्या

ST Bank Investigation : एसटी बँकेतील कथित गैरव्यवहारांची चौकशी; सहकार विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई, नेमकं काय घडलं?
1

ST Bank Investigation : एसटी बँकेतील कथित गैरव्यवहारांची चौकशी; सहकार विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई, नेमकं काय घडलं?

MSRTC Electric Bus: २०३७ पर्यंत एसटीची ‘ई-लालपरी’! संपूर्ण ताफा १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे लक्ष्य
2

MSRTC Electric Bus: २०३७ पर्यंत एसटीची ‘ई-लालपरी’! संपूर्ण ताफा १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे लक्ष्य

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद
3

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद

ST News : ‘एसटी तेथे एसटी!’ दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी लालपरीची खास धाव; 100 मिडी बसेस ताफ्यात दाखल होणार
4

ST News : ‘एसटी तेथे एसटी!’ दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी लालपरीची खास धाव; 100 मिडी बसेस ताफ्यात दाखल होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.