Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटीच गेली रस्त्याच्या कडेला; चालकाने वेळीच सतर्कता दाखवली अन् दुर्घटना टळली

काही दिवसांपूर्वी पाटबंधारे विभागाचा बेबी कॅनॉलचे पाणी वाहून नेण्यासाठी, पाईप टाकण्यासाठी या ठिकाणी दुभाजकासह दोन्ही बाजूंनी रस्ता उकरला होता. मात्र, काम होऊन काही दिवस झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 11, 2025 | 12:33 PM
रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटीच गेली रस्त्याच्या कडेला; चालकाने वेळीच सतर्कता दाखवली अन् दुर्घटना टळली

रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटीच गेली रस्त्याच्या कडेला; चालकाने वेळीच सतर्कता दाखवली अन् दुर्घटना टळली

Follow Us
Close
Follow Us:

वरवंड : पुणे-सोलापूर हायवेच्या दुभाजकाला ओलांडून जाणाऱ्या रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात गेली. ही घटना वरवंड येथील इंडियन पेट्रोल पंपासमोर घडली. एसटी बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती दौंड एसटी डेपोचे वाहन परिक्षक अनिल भागवत यांनी घटनास्थळी दिली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरून (एमएच २० बीएल २०३४) औसा-वल्लभनगर ही बस पुणे बाजूकडे जात होती. ही बस वरवंडजवळ असलेल्या इंडियन पेट्रोल पंपाजवळ आली असताना, एक रिक्षा दुभाजकातून थेट एसटी बसला आडवी आली. या रिक्षाला वाचवण्यासाठी चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रिक्षाचा मोठा अपघात टळला. मात्र, निसरड्या झालेल्या रस्त्यामुळे बस थेट खड्ड्यात गेली. यावेळी बसमध्ये 24 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने बसमधील कोणतीही जीवितहानी झाली नाही.

काही दिवसांपूर्वी पाटबंधारे विभागाचा बेबी कॅनॉलचे पाणी वाहून नेण्यासाठी, पाईप टाकण्यासाठी या ठिकाणी दुभाजकासह दोन्ही बाजूंनी रस्ता उकरला होता. मात्र, काम होऊन काही दिवस झाले. उकरलेला दुभाजक दुरुस्त न बांधल्यामुळे येथूनच छोटी मोठी वाहने पेट्रोल सीएनजी गॅस, भरण्यासाठी खुलेआमपणे रस्ता ओलांडत आहेत. यामुळे येथे होत असलेल्या अपघाताला रस्ते कंपनी जबाबदार राहणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

एसटीच्या अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट

या अपघाताची माहिती अपघातग्रस्त बसचे चालक व वाहक यांनी दौंड डेपोला दिल्यानंतर दौंड डेपोचे कर्मचारी परीक्षक अनिल भागवत, यांत्रिक पाळी प्रमुख विलास टिक्के व सहाय्यक सुनिल फरगडे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली. यावेळी पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना इतर बसने बसवून देण्यात आले.

बेस्ट बसची ट्रकला जोरदार धडक

दुसऱ्या एका घटनेत, मुंबईत बेस्ट बसचा ट्रकला धडकून अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमधील पाच ते सहा प्रवासी या अपघातात गंभीर जखमी झाले आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ही बस बोरिवलीहून अंधेरीच्या दिशेने जात होती. गोरेगाव परिसरातील वनराई पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जाताना बेस्ट बसचा ताबा सुटला. यावेळी प्रचंड वेगात होती. नियंत्रण सुटल्यामुळे बेस्टने बसने एका ट्रकला मागून जोरदार धडक दिली.

Web Title: St went to the side of the road in an attempt to save the rickshaw

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2025 | 12:33 PM

Topics:  

  • maharashtra
  • ST Department

संबंधित बातम्या

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
1

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
2

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Local Body Election :  ‘Gen-Z’ लादेखील राजकारणाचे आकर्षण! नोकरी सोडून राजकारणात प्रवेश
3

Maharashtra Local Body Election : ‘Gen-Z’ लादेखील राजकारणाचे आकर्षण! नोकरी सोडून राजकारणात प्रवेश

Nashik Municipal Election : शिवसेनेकडून १०१ उमेदवार रिंगणात; मनपा निवडणुकीत जुन्या-नव्यांचा मेळ साधत जिंकण्याची रणनीती
4

Nashik Municipal Election : शिवसेनेकडून १०१ उमेदवार रिंगणात; मनपा निवडणुकीत जुन्या-नव्यांचा मेळ साधत जिंकण्याची रणनीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.