
हडपसर - उरळीकांचन दरम्यान सहा पदरी उड्डाणपूल
मुंबई : सध्या प्रत्येकाला आपलं स्वत:चं घर असावं असं वाटतं. त्यासाठी अनेकांचा तसा प्रयत्नही असतो. पण आता आपल्याला त्यासाठी मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. कारण येत्या नव्या आर्थिक वर्षापासून म्हणजेच एक एप्रिलपासून मुद्रांक शुल्कात (Stamp Duty) वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तुम्ही जर घर घेण्याचा विचार करत असाल तर 31 मार्चपूर्वी खरेदी करा. अन्यथा घर खरेदी किंवा जमीन खरेदी करणे महागात पडणार आहे.
महाराष्ट्रात मुद्रांक शुल्कात एक एप्रिलपासून वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ एक टक्क्यांची असेल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता घर किंवा जमीन खरेदीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. तसेच रेराअंतर्गत टायटल इन्शुरन्स नावाचा नवा फेरा राज्य सरकारने आधीच आणला आहे. त्यात आता मुद्रांक शुल्कात वाढ होणार आहे. या वाढीमुळे घर घेणे अधिक महाग होणार आहे.
घरांच्या किमती भडकणार
राज्य सरकारने रेराअंतर्गत टायटल इन्शुरन्स नावाचा नवा फेरा आणला आहे. हा एक विम्याचा प्रकार आहे. हा विमा काढणं जमीन मालक आणि विकासकांना सक्तीचे असणार आहे. त्यामुळे घरांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. ज्या जमिनीवर बांधकाम होणार, त्या जमिनीचा विमा म्हणजे टायटल इन्शुरन्स गरजेचे आहे.
1 एप्रिलपासून मुद्रांक शुल्क वाढणार
तुम्ही जर घर खरेदी तसेच जमीन खरेदी करणार असाल तर तुम्हाला आता जास्त पैसे मोजण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. 1 एप्रिलपासून स्टॅम्प ड्युटी 1 टक्क्यानं वाढणार असल्याची माहिती दिली जात आहे. सध्या घर आणि जमीन खरेदीवर 7 टक्के स्टॅम्प ड्युटी आहे. ही स्टॅम्प ड्युटी आता 8 टक्के होण्याची शक्यता आहे.