
Maharashtra Breaking News Updates Today
17 Jul 2026 11:05 AM (IST)
टेक कंपनी OpenAI ने त्यांचे पहिले हार्डवेअर डिव्हाईस लाँच केले आहे. हे डिव्हाईस म्हणजे कंपनीची कोडिंग ऍक्सेसरी आहे. कंपनीने लाँच केलेले हे डिव्हाईस ओपनएआयच्या एआय कोडिंग आणि प्रोडक्टिव्हिटी एजेंट कोडेक्सला जोडलेला आहे. ओपनएआयने हार्डवेअर डिझाईन कंपनी वर्क लाउडर सोबत पार्टनरशिप करून हे नवीन प्रॉडक्ट तयार केले आहे. या प्रॉडक्टचे डिझाईनर जॉनी आयव्ह आहेत, ज्यांनी यापूर्वी ऍपलमध्ये काम केले आहे.
17 Jul 2026 10:51 AM (IST)
मुंबईचे माजी जिल्हाधिकारी यांच्याकडे काही काळ हाफकिन महामंडळाचा व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. यावेळी हाफकिन मंडळातील लाचलुचपत विभागाअंर्तगत चाैकशी सुरु असलेल्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हाेते.
17 Jul 2026 10:41 AM (IST)
पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत संघर्षाचा भडका उडाला आहे. एकीकडे PoK मध्ये तणावपूर्ण परिस्थितीत असताना बलुचिस्तानमध्ये पुन्हा मोठा हल्ला झाला आहे. बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने पाकिस्तानी सैन्यांच्या बसला स्फोटकांनी उडवून दिले आहे. या हल्ल्यात ४५ जवान ठार झाल्याचा दावाही BLA ने केला आहे. परंतु अद्याप पाकिस्तानी लष्करी किंवा सरकारकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
17 Jul 2026 10:31 AM (IST)
बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी सोमी अलीने सलमान खानला बिश्नोई समाजाची माफी मागण्याचा सल्ला दिल्याचा दावा करत काही नवे आरोप केले आहेत.
17 Jul 2026 10:21 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात अमेरिकेकडून इराणवर क्रूर हल्ला केला जात आहे. नैऋत्य इराणमधील कर्करोग रुग्णालयाला जवळच्याच ठिकाणी झालेल्या जोरदार हवाई हल्ल्यांमुळे रिकामे करण्यास भाग पाडल्यानंतर हा आरोप करण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी ट्विटरवर लिहिले की, आरोग्य सुविधांवरील इस्रायलच्या अत्याचारांची आठवण करून देणाऱ्या या क्रूर हल्ल्यामुळे तेथे रुग्णालयात दाखल असलेल्या मुलांमध्ये प्रचंड दुःख आणि घबराट पसरली.
17 Jul 2026 10:11 AM (IST)
आज, १७ जुलै, आधुनिक अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे स्कॉटिश अर्थतज्ज्ञ ॲडम स्मिथ यांचा स्मृतिदिन आहे. मुक्त बाजारव्यवस्था, स्पर्धा, श्रमविभाजन या संकल्पाना त्यांनी जगासमोर मांडल्या. The Wealth of Nations हा त्यांचा ग्रंथ अर्थशास्त्रातील मौलाचा दगड मानला जातो. त्यांच्या विचारांचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव आहे. आजही अर्थशास्त्राच्या अभ्यासत्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.
17 Jul 2026 10:02 AM (IST)
भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, आज १७ जुलै रोजी शुक्रवारी स्थिर सुरुवात करण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात सपाट असल्याचे दर्शवतात. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास २ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, २४,०९८ च्या पातळीवर व्यवहार करत होता.
17 Jul 2026 09:35 AM (IST)
वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात अमेरिकेकडून इराणवर क्रूर हल्ला केला जात आहे. नैऋत्य इराणमधील कर्करोग रुग्णालयाला जवळच्याच ठिकाणी झालेल्या जोरदार हवाई हल्ल्यांमुळे रिकामे करण्यास भाग पाडल्यानंतर हा आरोप करण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी ट्विटरवर लिहिले की, आरोग्य सुविधांवरील इस्रायलच्या अत्याचारांची आठवण करून देणाऱ्या या क्रूर हल्ल्यामुळे तेथे रुग्णालयात दाखल असलेल्या मुलांमध्ये प्रचंड दुःख आणि घबराट पसरली.
केमोथेरपी घेत असलेल्या 211 रुग्णांना बाहेर काढण्यात आले. रुग्णालयाचे संचालक रझा बाजार म्हणाले की, अहवाज शहरावरील अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे रुग्णालय बंद करण्यात आले होते. लष्कराचे प्रवक्ते मोहम्मद अक्रमिनिया यांनी इशारा दिला आहे की, जर अमेरिकेने इराणवरील हल्ले सुरूच ठेवले, तर हे हल्ले नवीन भागांत पसरतील. जेव्हाही अमेरिकी सैन्य होर्मुझ ते खार्गपर्यंतच्या भागांवर छापे टाकते, तेव्हा ते रात्रीच्या वेळीच करतात. मग, अचानक 15 जुलैला युद्धविराम मोडल्यापासून पहिल्यांदाच अमेरिकेने इराणवर दिवसाढवळ्या हल्ले केले.
17 Jul 2026 09:30 AM (IST)
FDA Action Parsi Dairy Farm: अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने दक्षिण मुंबईतील मरीन लाइन्स परिसरातील १०० वर्षे जुन्या आणि अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या 'पारशी डेअरी फार्म'वर (Parsi Dairy Farm) एफडीएने मोठी कारवाई केली आहे. शुद्धता आणि दर्जेदार उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेल्या या ऐतिहासिक दुकानात एफडीएच्या पथकाने तपासणी केली असता, तिथे स्वच्छतेबाबत अनेक त्रुटी आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघडकीस आले. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित नियमांबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे धोरण स्वीकारत एफडीएने तात्काळ परवाना निलंबनाची कारवाई केली. पारशी डेअरी फार्मची स्थापना १९१६ मध्ये झाली असून, मुंबईच्या खाद्यसंस्कृतीच्या इतिहासात या दुग्धालयाला आणि मिठाई केंद्राला मोठे मानाचे स्थान आहे.
17 Jul 2026 09:25 AM (IST)
Chhatrapati Sambhajinagar Black Magic Case: भाऊबंदकीचा वाद आणि राजकीय वैमनस्यातून थेट काळ्या जादूचा (Black Magic) अघोरी प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला आहे. सातारा परिसरातील माजी सरपंच फेरोज पटेल आणि त्यांच्या तीन भावांना जादूटोणा करून संपवण्याचा भयानक कट रचण्यात आला होता. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने पावले उचलत आरोपी आयुबखान उर्फ अय्युबखान जब्बारखान पठाण याला अटक केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा गावातील स्थानिक राजकीय वर्चस्व आणि व्यावसायिक वादातून हा अघोरी कट रचण्यात आला होता. आरोपी आयुबखान याने एका मांत्रिकाला हाताशी धरून माजी सरपंच फेरोज पटेल आणि त्यांच्या भावांचे फोटो एका झाडावर उलटे टांगले होते. त्या फोटोंवर विशिष्ट विधी करून त्यांना जीवे मारण्याचा किंवा त्यांचे मोठे शारीरिक-आर्थिक नुकसान करण्याचा अघोरी प्रयत्न सुरू होता.
17 Jul 2026 09:20 AM (IST)
Mahesh Tutorials Closing: गेल्या काही वर्षांपासून मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांमध्ये प्रचंड गाजावाजा असणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्कृष्ट गुणांची हमी देणारी नामांकित कोचिंग संस्था 'एम.टी. एज्युकेअर लिमिटेड'ने (महेश ट्युटोरियल्स) आपल्या सर्व शाखा अचानक बंद करण्याचा धडाका लावला आहे. तब्बल ३८ वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेली आणि शैक्षणिक क्षेत्रात दबदबा निर्माण केलेली ही नामांकित संस्था अचानक बंद झाल्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक वर्तुळात प्रचंड आश्चर्याचा धक्का बसला असून मोठी खळबळ उडाली आहे.
17 Jul 2026 09:15 AM (IST)
Gold Rate Today: भारतात 17 जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,328 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,134 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,746 रुपये आहे. भारतात 17 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,31,340 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,43,280 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,07,460 रुपये आहे. भारतात 17 जुलै रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 234.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,34,900 रुपये आहे.
17 Jul 2026 09:10 AM (IST)
Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी घेतलेली भेट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. पण राष्ट्रवादीच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना या भेटीची कोणतीही पूर्वकल्पना नव्हती, असे बोलले जात आहे. यावरून पक्षातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. पण सुनेत्रा पवार मात्र या भेटीवरून चांगल्याच नाराज झाल्याचे पाहायला मिळाले.
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या इतिहासात आज एका नव्या हरित पर्वाला प्रारंभ होत आहे. रेल्वेमार्गावर आवाज किंवा धूर दिसणार नाही, एका स्वच्छ भविष्याचा वेग दिसेल. हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानावर चालणारी भारतातील पहिली ट्रेन रुळांवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. ही ट्रेन सुरुवातीला जिंद आणि सोनीपत रेल्वे स्थानकांदरम्यान धावेल.
पारंपरिक इलेक्ट्रिक किंवा डिझेल इंजिनच्या विरुद्ध ही ट्रेन हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानावर आधारित आहे. या प्रक्रियेत, हायड्रोजनचे विजेमध्ये रूपांतर केले जाते, जी ट्रेनला पुढे नेते. या प्रक्रियेत कार्बन उत्सर्जन होत नाही आणि उप उत्पादन म्हणून फक्त पाण्याची वाफ तयार होते. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ही ट्रेन स्वतःच ऊर्जा निर्माण करते. ती हवेतील ऑक्सिजनची हायड्रोजनसोबत अभिक्रिया करून वीज निर्माण करते, ज्यामुळे इंधनाचे ज्वलन टाळले जाते आणि कोणत्याही बाह्य वीज पुरवठ्याची आवश्यकता राहत नाही.