Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मतपेढी सुधारण्यासाठी प्रभू श्रीरामाचा आधार’; चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या ‘रामरक्षा’ पठणाला म्हटले ‘ढोंगीपणा’

Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray: भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जनसमर्थन गमावल्यानंतर उद्धव ठाकरे राजकीय फायद्यासाठी 'रामरक्षा' मोहिमेचा ढोंगीपणा करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 17, 2026 | 04:18 PM
चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या 'रामरक्षा' पठणाला म्हटले 'ढोंगीपणा' (Photo Credit- X)

चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या 'रामरक्षा' पठणाला म्हटले 'ढोंगीपणा' (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ‘मतपेढी सुधारण्यासाठी प्रभू श्रीरामाचा आधार’
  • चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या ‘रामरक्षा’ पठणाला म्हटले ‘ढोंगीपणा’
  • वाचा सविस्तर बातमी!
नागपूर: उद्धव ठाकरे (Uddhav Thaceray) यांच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी त्यांच्यावर तीव्र शब्दांत राजकीय निशाणा साधला आहे. “उद्धव ठाकरे हे प्रभू श्रीरामाचा राजकीय आधार घेऊन आपला गमावलेला पाठिंबा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा थेट आरोप बावनकुळे यांनी केला. तसेच ठाकरेंची नागपूरमधील आगामी ‘रामरक्षा’ मोहीम ही पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावाही त्यांनी केला. नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या बदलत्या राजकीय भूमिकेवर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून चौफेर टीका केली.

सर्वांनी सोडल्यानंतर प्रभू श्रीराम आठवले – बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “जेव्हा रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची खरी गरज होती, तेव्हा उद्धव ठाकरे कुठेच दिसले नाहीत. परंतु आता जेव्हा पक्षातील सर्व नेत्यांनी आणि जनतेने त्यांना सोडले आहे, तेव्हा त्यांना अचानक प्रभू श्रीरामाची आठवण झाली आहे.” उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण म्हणजे केवळ राजकीय ढोंगीपणा असून त्यांनी श्रीरामाला राजकीय मुद्दा बनवले आहे. याउलट, भाजप आणि आमच्यासाठी प्रभू श्रीराम हे राजकीय मुद्दा नसून श्रद्धा, मूल्ये आणि संस्कृतीचे प्रतीक आहेत, असेही ते म्हणाले.

Nagpur, Maharashtra: Reacting to Shiv Sena (UBT) chief and former Chief Minister Uddhav Thackeray’s “Ram Raksha campaign,” Minister Chandrashekhar Bawankule says, “Launching an agitation is his democratic right, but if Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray were watching today,… pic.twitter.com/OG66YPBB9M — IANS (@ians_india) July 17, 2026

मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरून सुनेत्रा पवार नाराज? सुनील तटकरे यांनी दिलं स्पष्ट उत्तर

फडणवीसांना हिंदुत्वाचे धडे देण्याची गरज नाही!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हिंदुत्वावर बोलण्याचा उद्धव ठाकरेंना कोणताही अधिकार नाही, असे सांगत बावनकुळे यांनी फडणवीसांचे कौतुक केले. “देवेंद्र फडणवीस हे सुरुवातीपासूनच रामजन्मभूमी आंदोलनाशी जोडलेले आहेत. त्यांनी हिंदू परंपरा आणि संस्कृतीच्या जतनासाठी काम केले आहे. बाबरी आंदोलनातील कारसेवेत त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता, तर दुसरीकडे टीका करणारे लोक त्यावेळी घरात निष्क्रिय बसून होते,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच उद्धव ठाकरे जेव्हा जेव्हा नागपूरला येतात, तेव्हा ते केवळ राजकीय विरोधकांवर वैयक्तिक टीका करण्यापलीकडे काहीच करत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.

संजय राऊतांचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र

या राजकीय वादाची पार्श्वभूमी अशी की, उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांना एक पत्र लिहिले आहे. नागपुरात आयोजित पक्षाच्या ‘रामरक्षा’ मोहिमेत भागवत यांनी सहभागी व्हावे, असे निमंत्रण या पत्राद्वारे देण्यात आले आहे. अयोध्या राम मंदिरातील देणग्यांमध्ये मोठा गैरव्यवहार झाला असून यामुळे हिंदूंच्या श्रद्धा दुखावल्या गेल्याचा आरोप राऊत यांनी पत्रात केला आहे. हा वादग्रस्त कार्यक्रम १८ जुलै रोजी सायंकाळी ४:३० वाजता नागपूरमधील रामनगर येथील राम मंदिरात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

जयंत पाटील-एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; ‘रामदास आठवलेंना भेटले तर…’

Web Title: Chandrashekhar bawankule termed uddhav thackerays recitation of ramraksha as hypocrisy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 04:18 PM

Topics:  

  • BJP
  • chandrashekhar bawankule
  • Maharashtra Politics
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: नेपाळमधील महापूर, मराठा आरक्षण आणि शेअर बाजारातील अस्थिरता
1

Maharashtra Breaking News Today 2026: नेपाळमधील महापूर, मराठा आरक्षण आणि शेअर बाजारातील अस्थिरता

फलकावरून वाद, बुलढाण्यात राजकीय संघर्षाची ठिणगी; भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
2

फलकावरून वाद, बुलढाण्यात राजकीय संघर्षाची ठिणगी; भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

मी सरकारचा भाग नाही, मी आमदार अन्…; सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाने भाजपमध्ये खळबळ
3

मी सरकारचा भाग नाही, मी आमदार अन्…; सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाने भाजपमध्ये खळबळ

BJP Leader Murder : भाजप नेत्याची चाकूने हत्या, धारदार शस्त्राने वार करुन जागेवरच संपवलं; कारण…
4

BJP Leader Murder : भाजप नेत्याची चाकूने हत्या, धारदार शस्त्राने वार करुन जागेवरच संपवलं; कारण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.