‘उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भविष्यात एकत्र येतील’; शिवसेनेच्या मंत्र्याचं मोठं विधान
आज जे चित्र दिसतं, तेच चित्र उद्या असेल असं नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचंच पाहा ना. १९ वर्षांपूर्वी वेगळं झाल्यानंतर तेही एकमेकांकडे पाहत नव्हते. हसत नव्हते. आता ५ जुलै रोजी मात्र त्यांनी एकमेकांना आलिंगन दिलं. भविष्यात यदा कदाचित हाच प्रसंग उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबतीतही होऊ शकतो. पण त्यासाठी वाट पाहावी लागेल, असं सूचक विधान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
ठाकरे ब्रँड त्याच दिवशी संपला, ज्या दिवशी…; मंत्री गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
विधिमंडळात शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसायला नकार दिला . तसेच हे दोन नेते एकमेकांना नमस्कारही करत नाहीत, असा प्रश्न प्रताप सरनाईक यांना विचारण्यात आला होता. त्यावर सरनाईक यांनी हे उत्तर दिलं आहे. राजकारणात कोणीही कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो, असा उल्लेखही त्यांनी केला. मी आणि जितेंद्र आव्हाड बालपणापासून मित्र आहोत. पण मागच्या नऊ वर्षांत आमच्यातून विस्तवही जात नव्हता. आमचं पटत नव्हतं. पण शेवटी नऊ वर्षांनंतर काही ना काही निमित्ताने आम्ही पुन्हा एकत्र आल्याचं ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात शनिवारी झालेल्या एका भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी ‘आमच्या भेटीच्या बातम्या बघून काही नेते गावाला निघून जातील’, असं विधान केलं होतं. त्याबाबत प्रताप सरनाईक यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
त्यावर उत्तर देताना प्रताप सरनाईक म्हणाले, सर्वच राजकीय पक्षाचे नेते एकमेकांना भेटत असतात. त्यातून राजकीय अर्थ काढणं चुकीचं आहे. अधिवेशनातच विधिमंडळात भाषण करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याचं आवाहन केलं होतं. ‘२०१९ पर्यंत आम्ही तरी विरोधात येऊ शकत नाही, पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही याबाजूला सत्ताधारी बाकावर बसू शकता’, असं म्हटलं होती. त्याची आठवण यानिमित्ताने प्रताप सरनाईक यांनी यावेळी करून दिली.