State Women's Commission letter to Pune Police Dinanath Mangeshkar Hospital Pune case
पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. ऑपरेशनच्या पूर्वी पैशांची मागणी करत उपचार करण्यासाठी दिरंगाई केल्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे रुग्णालयावर चौफेर टीका केली जात आहे. यामध्ये रुग्णालयाने स्वतःचीच समिती तयार करुन अहवाल सादर केला. मात्र यामध्ये त्यांनी मृत रुग्णांची वैयक्तिक माहिती जाहीर केली. यावरुन दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी राज्य महिला आयोगाकडून करण्यात आली आहे.
गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी राज्य महिला आयोगाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील दौरा करुन प्रशासकीय भेटी घेतल्या आहेत. तसेच कडक कारवाईचा इशारा देखील दिला आहे. दरम्यान, मंगेशकर रुग्णालयातील या प्रकरणी महिला आयोगाचे पुणे पोलीस व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला पत्र लिहिले आहे. याबाबत
महिला आयोगाला भिसे कुटूंबियांकडून पत्र लिहिण्यात आले होते. यानंतर राज्य महिला आयोगाने तातडीने एक्शन घेत पुणे पोलिसांनी कारवाईबाबत पत्र लिहिले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गर्भवती महिला मृत्यूप्रकरणात दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने रुग्ण महिलेची वैयक्तिक माहिती सार्वजनिक केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी, असे निर्देश महिला आयोगाने दिले आहेत. पुणे पोलीस व महाराष्ट्र मेडकिल कौन्सिल यांना हे पत्र पाठवून निर्देश दिले असून, कारवाईचा अहवाल देखील सादर करण्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. तनिषा भिसे ही गर्भवती महिला दिनानाथ रुग्णालयात आल्यानंतर तिच्याकडे 10 लाख रुपये मागितले. पैसे न जमा केल्याने महिलेवर उपचार केले नाही. नंतर महिला दुसऱ्या रुग्णालयात गेली. त्याठिकाणी तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र, नंतर तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात भिसे कुटूंबियांकडून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोप केले होते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याप्रकरणात राज्य शासनाने समिती स्थापनकरून चौकशीचे आदेश दिले आहेत. वेगवेगळ्या तीन समितीकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, रुग्णालयाने रुग्ण महिलेची वैयक्तिक माहिती परवानगीशिवाय सार्वजनिक केल्याचा आरोप आता भिसे कुटूंबियांकडून होत आहे. कुटूंबाने याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी महिला आयोगाकडे पत्राद्वारे केली. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यासंदंर्भात पुणे पोलीस आयुक्त तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला पत्राद्वारे कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या कारवाईचा अहवाल आयोगाला सादर करावा असेही म्हंटले आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर केलेल्या अंतर्गत चौकशीचा अहवाल सार्वजनिक केला.मृत तनिषा आणि भिसे कुटुंबीयांची वैयक्तिक माहिती परवानगीविना सार्वजनिक केल्याने मानसिक त्रास झाल्याची तक्रार सविता भिसे यांनी राज्य महिला आयोगाकडे केली आहे.
आयोगाने… pic.twitter.com/r4FvFg6YGY— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) April 9, 2025
श्रीमती सविता भिसे व इतर यांचा तक्रार अर्ज आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. आपल्या सुलभसंदर्भासाठी त्यांनी आयोगाकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत सोबत जोडली आहे. सदर तक्रार अर्ज आपल्या कार्यालयाशी संबंधित असल्याने त्यावर तातडीने कारवाई करुन कार्यवाही करावी व तसे अर्जदारास कळवावे, तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार आपण केलेल्या कार्यवाहीचा चौकशी अहवाल तात्काळ आयोग कार्यालयास पाठविण्यात यावा, असे पत्र आयोगाने लिहिले आहे.