शिरोळ तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार
शिरोळ तालुक्याने गेल्या ५० वर्षांपासून जपलेले स्वप्न अखेर साकार होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य भीमसृष्टी उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व जयसिंगपूर नगरपरिषदेच्या वतीने घेतला असून या पुतळ्याचा भव्य आगमन सोहळा रविवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सायं. ४.०० वा. पार पडणार आहे. या सोहळ्यात शिरोळ तालुक्यातील बहुजन समाज, भीमसैनिक व आंबेडकर प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती ॲड. संभाजीराजे नाईक, समन्वयक सुरेश कांबळे, देवेंद्र कांबळे, राजेंद्र झेले, दादासो पाटील चिंचवाडकर, मिलींद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये 21 ते 28 सप्टेंबरदरम्यान ‘भीमज्योत परिक्रमा’ आयोजित करण्यात आली आहे. ही ज्योत शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावात जाणार आहे. सात दिवस चालणाऱ्या या भव्य यात्रेत शेकडो भीमसैनिक, अनुयायी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरप्रेमी जनता सहभागी जनजागृती प्रबोधनाचा संदेश देणार आहेत.
Pune Heavy Rain: परतीच्या पावसाने पुणे बेहाल! अचानक झालेल्या सरींमुळे शहरात अक्षरशः…
२८ सप्टेंबर रोजी सकाळी ८.०० ते ११.०० या वेळेत जयसिंगपूर शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात येणार असून त्यात शेकडो युवा-युवतींचा सहभाग असणार आहे. त्यानंतर सायं. ४.०० वाजता शिवतीर्थ, जनतारा हायस्कूलसमोर, कोल्हापूर-सांगली रोड येथून आगमन सोहळ्याची भव्य मिरवणूक सुरू होईल.
मिरवणुकीत नेत्रदीपक लाईट इफेक्ट्स, महिला लेझीम पथक, दाक्षिणात्य ढोल पथक, बँड पथक, ढोलताशा, डान्स ग्रुप, नयनरम्य आतिषबाजी, चित्ररथ व डीजे साऊंड या आकर्षक कार्यक्रमांचा समावेश आहे.
या भव्य सोहळ्यास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, मुख्याधिकारी टिना गवळी यांच्यासह शिरोळ तालुक्यातील सर्व मान्यवर, पदाधिकारी व नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. सर्व समाजघटक, पक्ष, संघटना, सामाजिक संस्था, युवक मंडळे व आंबेडकर प्रेमींना या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या मिरवणुकीत पत्रकार परिषदेस अनुप मधाळे, आनंदा शिंगे, रजनीकांत कांबळे,अशोक मळगे, भरत कांबळे, सुनील कांबळे, बाळासाहेब कांबळे, सेनापती भोसले, अमरदीप कांबळे, विकी गायकवाड, स्वप्निल कांबळे, अमोल कांबळे, ओंकार कांबळे, महेश कांबळे, सुशांत भोसले, अक्षय सावंत, विराज कांबळे, गणेश कांबळे, संजय शिंदे, बी. आर. कांबळे,शशिकांत घाटगे, सागर बिरणगे, संगिताताई व्हसमाने, जॉन सकटे, खंडू भोरे, सुनिल कांबळे, पांडूरंग चंदूरे, शितल गतारे, पराग पाटील, संभाजी मोरे, आसलम फरास, सुनील मजलेकर, बजरंग खामकर , राजेंद्र आडके, अर्जुन देशमुख, पिंटू खामकर, महेश कलकुटगी, राहुल बंडगर, राजू रावण, प्रकाश पवार यांच्यासह शिरोळ तालुक्यातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.