ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचे निधन (फोटो- सोशल मिडिया)
इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे कालवश
वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार म्हणून होती ओळख
Gajanan Mehendale Death/पुणे: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे (वय ७८) यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुण्यामध्ये निधन झाले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळात ठेवण्यात येणार आहे. गेली ५० वर्षे त्यांनी इतिहासाच्या संशोधन कार्याला वाहून घेतले होते.
शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांनी शिवचरित्रावर मराठी आणि इंग्लिशमध्ये मोठे ग्रंथ लिहिले आहेत, जे आज इतिहास क्षेत्रामध्ये जगप्रसिद्ध आहेत. ते क्रियाशील संशोधक होते. फारसी, मोडी, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन अशा विविध भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. इतिहासातील सत्य आणि असत्य हे उघड करणं हा त्यांचा आवडता विषय होता. सध्या ते इस्लामची ओळख आणि औरंगजेब या विषयावर संशोधन आणि लिखाण करत होते. १९७१ च्या युद्धात बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही सीमेवर युद्ध पत्रकार म्हणून स्वतः हजर होते, आणि त्यांचा त्यावरही अभ्यास होता.
गजानन मेहेंदळे मिलिटरी सायन्सचे द्विपदवीधर होते. त्यांचा अनेक भाषांवर आणि इतिहासातल्या लिप्यांचा अभ्यास होता. त्यांनी शिवाजी झाला नसता तर, टिपू ॲज अ वॉर, शिवाजी लाईफ अँड टाईम, शिवचरित्र, मराठ्यांचे आरमार अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचा भांडारकर संस्था, भारत इतिहास संशोधक मंडळ तसेच विविध संस्थांशी निकटचा संबंध होता. सध्या त्यांचे दुसऱ्या महायुद्धावरच्या पुस्तकाचे काम सुरू होते, ज्याची सुमारे पाच हजार पाने लिहून प्रकाशित होण्यासाठी तयार झालेली आहेत.
गजानन मेहेंदळे यांचा जन्म 19 डिसेंबर 1947 मध्ये झाला. ज्येष्ठ मराठी इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार अशी त्यांची ओळख होती. भारत इतिहास संशोधक मंडळाशी सबंधित ते संशोधक होते. मुघलकालीन फारसी कागदपत्रांचे वाचन, त्यावर आधारित निष्कर्ष यावर त्यांनी अनेक व्याख्याने देखील दिली आहेत. तयांचे अनेक लेख, संशोधन लेख मराठी वृत्तपत्रे आणि मासिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत.
‘पीछे देखो पीछे’ व्हायरल मुलगा अहमद शाहवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीला दिला निरोप
‘पीछे देखो पीछे’ व्हायरल मुलगा अहमद शाहवर कोसळला दुःखाचा डोंगर
‘पिछे देखो पिछे’ या मीमने जगभरातील लोकांचं मन जिंकणारा बाल कलाकार अहमद शाहने अलीकडेच त्याच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी शेअर केली आहे. अहमदने स्वतः इंस्टाग्रामवर त्याच्या भावाच्या मृत्यूची दुःखद बातमी शेअर केली आहे. दोन वर्षांपूर्वी त्याच्या धाकट्या बहिणीचे निधन झाले होते आता त्याने त्याचा धाकटा भाऊ उमेर शाहला सुद्धा कायमचं गमावलं आहे. त्याच्या भावाच्या अचानक निधनामुळे त्याचे संपूर्ण कुटुंब धक्का बसला आहे.