Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीसिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात घुमला शास्त्रीय संगीताचा स्वर; ‘सिद्ध कलाविष्कार’ सभेला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार-प्रचार व्हावा आणि तरुण पिढीला या कलेची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 21, 2026 | 03:11 PM
श्रीसिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात घुमला शास्त्रीय संगीताचा स्वर; ‘सिद्ध कलाविष्कार’ सभेला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रीसिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात घुमला शास्त्रीय संगीताचा स्वर; ‘सिद्ध कलाविष्कार’ सभेला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Follow Us
Follow Us:

सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर येथे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आयोजित ‘सिद्ध कलाविष्कार’ या शास्त्रीय संगीत सभेला सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शनिवार (दि.१८) रोजी पार पडलेल्या या स्वर-सोहळ्याने मंदिर परिसर भक्तिमय आणि सुरेल वातावरणाने भारावून गेला.

भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार-प्रचार व्हावा आणि तरुण पिढीला या कलेची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात उपाध्यक्ष सिद्धेश्वर बमणी, माजी सभापती महादेव चाकोते, बाळासाहेब भोगडे, प्रकाश बिराजदार, नीलकंठप्पा कोनापुरे, डॉ. माधवी रायते आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्री सिद्धरामेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.

या मैफिलीत कनिष्का शिवपुजे यांनी आपल्या बहारदार शास्त्रीय गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी सादर केलेल्या रागमांडणीतून शास्त्रीय संगीतातील सूक्ष्मता आणि सौंदर्य खुलून आले. ‘भाग्यदा लक्ष्मी बाराम्मा’, ‘कानडा राजा पंढरीचा’, सिद्धेश्वर वचनगीत तसेच इतर भक्तिगीतांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

पाऊस कधी पडणार हे सांगणारं रहस्यमय मंदिर; विज्ञानालाही चकित करणारं कोडं

या सादरीकरणाला नितीन दिवाकर (तबला), ओंकार पाठक (संवादिनी) आणि प्रभाकर वाघचौरे (पखवाज) यांनी उत्कृष्ट साथसंगत दिल्याने मैफिलीत अधिक रंगत आली. कार्यक्रमाच्या शेवटी देवस्थान पंचकमिटीच्या वतीने सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. राजशेखर येळेकर, प्रा. गजानन धरणे, संत साहित्य अभ्यासक अनिल सर्जे, सिद्धार्थ सर्जे, चिदानंद मुस्तारे यांच्यासह सोलापूरमधील संगीतप्रेमी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनीता हलकुडे यांनी केले, सूत्रसंचालन राजेंद्र बलसुरे यांनी तर आभार प्रदर्शन पौर्णिमा शिवपुजे यांनी केले. उपस्थित रसिक व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

Ganga Saptami 2026 Daan : नशिब फळफळणार; गंगा सप्तमीला राशीनुसार असं करा दान, जाणून घ्या काय सांगतं शास्त्र?

Web Title: Strains of classical music resonated within the precincts of the shri siddheshwar temple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Solapur News

संबंधित बातम्या

Vitthal Rukmini Mandir Darshan: विठ्ठल भक्तांसाठी मोठी बातमी!  मंदिर समितीकडून महत्त्वाची माहिती जारी
1

Vitthal Rukmini Mandir Darshan: विठ्ठल भक्तांसाठी मोठी बातमी! मंदिर समितीकडून महत्त्वाची माहिती जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.