Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Virar Illegal Construction: वसईत अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई; महापौरांचा आक्रमक इशारा

वसई परिसरात अनधिकृत बांधकामांना यापुढे थारा मिळणार नाही आणि शहराच्या सौंदर्यात बाधा आणणाऱ्या गोष्टींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा महापौर अजीव पाटील यांनी दिला.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 12, 2026 | 04:06 PM
पुण्यात आता अनधिकृत बांधकाम आढळल्यास अभियंताच जबाबदार; स्थायी समितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

पुण्यात आता अनधिकृत बांधकाम आढळल्यास अभियंताच जबाबदार; स्थायी समितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:
  • वसई-विरारसाठी महापालिकेची मोहीम
  • उड्डाणपूल आणि रुग्णालय प्रकल्पांना गती देण्याचे आदेश
  • अनधिकृत बांधकामांना थारा नाही 
 

Vasai Virar Illegal Construction: वसई परिसरात अनधिकृत बांधकामांना यापुढे थारा मिळणार नाही आणि शहराच्या सौंदर्यात बाधा आणणाऱ्या गोष्टींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा महापौर अजीव पाटील यांनी दिला असून शहरातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच आपण सुंदर आणि सुरक्षित वसई-विरारची निर्मिती करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे. महानगरपालिकेच्या मुख्यालयात महापौर अजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक व्यापक आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत शहराचा चेहरामोहरा बदलणारे प्रकल्प, रखडलेली विकासकामे आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत महापौरांनी प्रशासनाला कड़क निर्देश दिले. बैठकीनंतर महापालिकेच्या स्वच्छतादूतांना स्मार्ट वॉचचे वाटप करून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आणि माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी शहरवासीयांना दिलेली विकासकामांची वचने प्रत्यक्षात आणण्यासाठी या बैठकीत सविस्तर विचारविनिमय झाला.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अराजकता; रखडलेल्या कामामुळे नागरिकांमध्ये संताप उसळला

शहरात आकारास येत असलेल्या दिव्यांग व संविधान पार्क या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांच्या कामाची गती महापौरांनी तपासली. नारिंगी पापडखिंड येथील प्रस्तावित बर्ड पार्कच्या मार्गातील वनविभागाच्या परवानग्या व इतर तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देशही दिले, जीवदानी मंदिर पायथ्याशी असलेले क्रिकेट मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्याशी हितेंद्र ठाकूर यांच्याशी झालेल्या चर्चेचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही निश्चित करण्यात आली.

या बैठकीला उपमहापौर मार्शल लोपीस्, नगरसेवक प्रवीण शेट्टी, प्रफुल्ल साने, आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे व दीपक सावंत यांच्यासह सर्व विभागांचे उपायुक्त व महापालिका अधिकारी उपस्थित होते. शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी महापौरांनी आस्थेटिक इमाव्हमेंट स्कीम राबवण्यावर भर दिला आहे. मुबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे स्थानक परिसरातील शंभर मीटरचा भाग फेरीवालामुक्त व मोकळा करण्याबाबात त्याच्या कडक सूचना आहेत. यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, रिक्षाचालक, फेरीवाले आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे महापौर पाटील यानी केले.

Vasai Virar Municipal Corporation: अनधिकृत बांधकामांवर कारवाईला गेलेल्या महापालिका पथकावर हल्ला!

वसई-आचोळे येथील चारशे खाटांचे रुग्णालय आणि नालासोपारा रुग्णालयातील विस्तारीकरण तातडीने पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला, शहरातील सात उडाणपूल, एमएमआरडीएचे तेरा रस्ते आणि २०१५ पासून प्रलंबित असलेल्या रिंगरूटचे काम मार्गी लावण्याचे आदेश दिले.परिवहन सेवेसाठी मुंबई वन अॅपचा वापर असेल. दमणच्या धर्तीवर वसईतील राजोडी, कळंब, अर्नाळा आणि वसई किनाऱ्यांचा कायापालट करणार आहेत. महापालिका इमारतीचा वीज खर्च वाचवण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प असेल.

Web Title: Strict action against unauthorized constructions in vasai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 04:06 PM

Topics:  

  • illegal construction
  • Vasai-Virar Municipal Corporation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.