
sub-divisional officer instructed the officers and staff assigned at the polling station to work in coordination
Nanded News : हिंगोली : प्रत्यक्ष मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी सोमवारी २४ नोव्हेंबर रोजी दिल्या आहेत. हिंगोली पालिका निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानासाठी प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. मतदान प्रक्रियेसाठी शहरातील मतदान केंद्रांवर सुमारे ४०० अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. न्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण कल्याण मंडपम येथे घेण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, पालिका मुख्याधिकारी अरविंद मुंडे, नायब तहसीलदार एस. के. कोकरे, प्रशांत बोरसे उपस्थित होते.
मतदान यंत्र व आवश्यक कागदपत्र घेताना तपासणी करूनच घ्यावे. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपविभागीय अधिकारी घुटुकडे यांनी मार्गदर्शन केले. मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान यंत्र व आवश्यक कागदपत्र घेताना तपासणी करूनच घ्यावे. मतदान केंद्रावर पुरेसा वीज पुरवठा असल्याची खात्री करून घ्यावी. मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. मतदान केंद्रावर गोंधळाची स्थिती निर्माण होत असल्याचे लक्षात येताच तातडीने पोलीस विभागाशी संपर्क साधून माहिती द्यावी तसेच बंदोबस्तावर व असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना याबाबत अवगत करावे. याशिवाय निवडणूक विभागाशी ही तातडीने संपर्क साधावा. मतदानाची टक्केवारी वेळेत सादर करावी.
महायुतीमध्ये का सुरु आहे नाराजीनाट्य? मुंबईचा महापौर कोणाचा? DCM एकनाथ शिंदेंनी स्पष्टच दिलं उत्तर
नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वय ठेवावा
मतदान केंद्रावर जाताना आवश्यक साहित्य सोबत घ्यावे. मतदान केंद्रावर अडचण असल्यास तातडीने निवडणूक विभागाशी संपर्क साधल्यास अडचणी दूर करणे शक्य होणार आहे. मतदान प्रक्रिया पार पडताना त्या त्या केंद्रावरील नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वय ठेवावा अशा सूचना घुटुकडे यांनी दिल्या आहेत.
हळदीला उसळीदार भाव
आज संत नामदेव कॉटन मार्केट येथे हळदीला तब्बल १३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला असून बाजारात अंदाजे १५०० पोत्यांची आवक झाली. चांगल्या प्रतीच्या हळदीला व्यापाऱ्यांकडून – उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाल्याने न शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. दरम्यान, संत नामदेव कॉटन मार्केट यार्ड 7 २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत बंद राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी याची नोंद घेऊन आपल्या मालाची आवक नियोजनपूर्वक करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.