Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्प अहवाल या तारखेपर्यंत सादर करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

राज्यातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भ आणि मराठवाडा विभागातील पाणीटंचाई दूर करण्यासोबतच प्रकल्प अहवाल (DPR) १५ ऑक्टोबरपर्यंत शासनाकडे सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 08, 2025 | 07:07 PM
वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्प अहवाल या तारखेपर्यंत सादर करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्प अहवाल या तारखेपर्यंत सादर करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भ आणि मराठवाडा विभागातील पाणीटंचाई दूर करण्यासोबतच शेतीला शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत शासनाकडे सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच आर्थिक नियोजनासाठी केंद्र सरकारकडे निधी मागणीसंदर्भात पत्र पाठवून पाठपुरावा केला जाईल आणि राज्य सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे सादरीकरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

 ‘एनडीए’कडून श्रीकांत शिंदेंची ‘या’ पदासाठी नियुक्ती, बैठकीत महत्त्वाचा निर्णय

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रकल्पाची तपासणी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीमार्फत करून सविस्तर प्रकल्प अहवाल १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत शासनाकडे सादर करावा. तसेच या प्रकल्पाला कालबद्ध नियोजन करून गती द्यावी. यासाठी केंद्र शासनाकडे पत्र पाठवून, प्रकल्पाच्या किमान २५ टक्के निधी केंद्र सरकारकडून मिळवता येईल का यासाठी राज्य सरकारकडून पाठपुरावा केला जाईल. राज्य शासनाकडूनही आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील गोसीखुर्द ते निम्न वर्धा सर्वेक्षणाचे काम वेळेत पूर्ण झाले आहे. पुढील कामकाजासाठी पर्यावरण मान्यता प्राप्त करून प्रकल्पाचा पहिला टप्पा तात्काळ सुरू करावा, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

तापी पुनर्भरण व वैनगंगा-नळगंगा

तापी खोऱ्यातील पुनर्भरणासाठी आपण नुकताच मध्यप्रदेश समवेत करार केला. या प्रकल्पातून बुलढाणा, अकोला, वाशिम या भागातील जो खारपाण पट्टा आहे त्यावर आपल्याला मात करता येईल. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात शेतीला पाणी उपलब्ध होणार आहे. वैनगंगा- नळगंगा नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे 500 किमीची नदीचे जाळे विदर्भात साकारणार आहे. अनेक वर्षापासून अपूर्ण असलेल्या गोसीखूर्द प्रकल्पाचे 90 टक्के काम आपण पूर्ण केले आहे. पाण्याची उपलब्धता यातून आपण करु शकलो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, पाण्याच्या अल्प पुरवठ्यामुळे शेतकर्‍यांना व शेतीला मोठ्या प्रमाणावर संकटांचा सामना करावा लागतो. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी नदीजोड प्रकल्प एक महत्त्वपूर्ण उपाय ठरू शकतो. या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे, पाणीटंचाई असलेल्या भागांमध्ये पाणीपुरवठा सुधारणे. एक नदी दुसर्‍या नदीला जोडली जाऊन, पाण्याचे वितरण अधिक सुलभ होईल. तसेच प्रकल्पाच्या माध्यमातून विविध भागांमध्ये सिंचनाची व्यवस्था सुधारणे. यामुळे शेतकर्‍यांना अधिक पाणी मिळेल आणि शेती व्यवसायाला अधिक चालना मिळेल. नदीजोड प्रकल्पामुळे जलसंचय करण्याची क्षमता वाढवता येईल, ज्यामुळे पाऊस कमी पडला तरी पाणी उपलब्ध राहील. हे कृषी उत्पादनावर सकारात्मक प्रभाव पाडू शकते. दिवसेंदिवस बदलत्या हवामानामुळे पर्जन्याचे प्रमाण विषम स्वरुपाचे झाले असून, काही भागांत अतिवृष्टी, तर काही भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. याचा परिणाम प्रत्यक्ष शेती क्षेत्रावर होताना दिसून येतो. हे चित्र बदलण्यासाठी नदीजोड प्रकल्प महत्त्वाचे आहेत. 

Thane News : कामाचे तास ९ वरुन १२ तास निर्णय राज्य सरकारने त्वरित रद्द करावा; कामगार संघटनेचा इशारा

Web Title: Submit the wainganga nalganga river link project report by this date instructions from devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 07:07 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “व्हिजन डॉक्युमेंट २०४७ प्रमाणे धोरण आखून विकसित महाराष्ट्राचे…” CM फडणवीसांचे प्रतिपादन
1

Devendra Fadnavis: “व्हिजन डॉक्युमेंट २०४७ प्रमाणे धोरण आखून विकसित महाराष्ट्राचे…” CM फडणवीसांचे प्रतिपादन

Eknath Shinde News: फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून तुम्हाला भाजपने बाजूला केलयं का? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर
2

Eknath Shinde News: फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून तुम्हाला भाजपने बाजूला केलयं का? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर

MPSC परीक्षेत यश मिळवणाऱ्या अश्विनी केदारी यांचे निधन, शरीराचा ८०% भाग एका वेदनादायक अपघातात भाजला
3

MPSC परीक्षेत यश मिळवणाऱ्या अश्विनी केदारी यांचे निधन, शरीराचा ८०% भाग एका वेदनादायक अपघातात भाजला

MHADA ची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांमध्ये मिळवा घर, या भागात मिळेल तुमच्या स्वप्नातील घर
4

MHADA ची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांमध्ये मिळवा घर, या भागात मिळेल तुमच्या स्वप्नातील घर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.