Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MHADA ची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांमध्ये मिळवा घर, या भागात मिळेल तुमच्या स्वप्नातील घर

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी असून तुम्ही जर घर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण म्हाडाकडून अगदी परवडणाऱ्या दरात घरांची लॉटरी काढण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 08, 2025 | 11:13 AM
MHADA ची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांमध्ये मिळवा घर (फोटो सौजन्य-X)

MHADA ची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांमध्ये मिळवा घर (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

MHADA Lottery 2025 News In Marathi : स्वत: चे आणि हक्काचे घर असावं असं प्रत्येकाच स्वप्न असते. आता तुमचं हेच स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आली आहे. म्हाडाकडून बंपर लॉटरी काढण्यात आली आहे. म्हाडा म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (Maharashtra Housing and Area Development Authority) कोकण मंडळाने घराच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आणली आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (Mhada) नाशिक मंडळाने नाशिक शहरी भागातील विविध निवासी प्रकल्पांतर्गत ४७८ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेचे उद्घाटन म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी मुंबईतील म्हाडाच्या मुख्यालयातून ‘गो-लाइव्ह’ कार्यक्रमांतर्गत केले.

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज

लॉटरी प्रक्रिया कशी असणार?

यावेळी मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार अवलकंठे, मुख्य अभियंता धीरजकुमार पंडीरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत ही लॉटरी आयोजित करण्यात आली आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सांगितले आहे की या लॉटरीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि पारदर्शक असेल.

घराची किंमत किती असेल?

घर विकत घेण्यापूर्वी घराची किंमत माहित असणं गरजेचे आहे. दरम्यान ग्राहकांनी कोणत्याही मध्यस्थांच्या मदतीशिवाय म्हाडाच्या अधिकृत वेबसाइट किंवा अॅपवरून थेट अर्ज करण्याचे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले. म्हाडाने विकसित केलेली प्रणाली अतिशय सोपी आणि सुरक्षित आहे. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता नाही. हे फ्लॅट कमी उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी उपलब्ध आहेत. नाशिक बोर्डाचा हा या वर्षीचा तिसरा ड्रॉ आहे आणि याआधी बोर्डाने ३७९ फ्लॅट, १०५ दुकाने आणि ३२ भूखंड यशस्वीरित्या वाटले आहेत. ही घरे १५.५१ लाख रुपयांपासून ते २७.१० लाख रुपयांपर्यंत उपलब्ध असतील.

तुम्ही कधीपर्यंत अर्ज करू शकता?

४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणीची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. ऑनलाइन ठेव रक्कम भरण्याची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत तुम्ही आरटीजीएस/एनईएफटीद्वारे पेमेंट देखील करू शकता. अंतिम यादी १७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता प्रकाशित केली जाईल.

तुम्हाला घर कुठे मिळेल?

या सोडतीत गंगापूर शिवार (५०), देवळाली शिवार (२२), पाथर्डी शिवार (६४), म्हसरूळ शिवार (१९६), नाशिक शिवार (१४) आणि आगर टाकळी शिवार (१३२) येथे फ्लॅट उपलब्ध आहेत. इच्छुक अर्जदारांनी कोणत्याही एजंट किंवा सल्लागारामार्फत अर्ज न करता म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करावेत असे आवाहन संजीव जयस्वाल यांनी केले आहे.

MHADA : म्हाडाचे घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर! 5285 सदनिकांसाठी अर्ज 

Web Title: Mhada lottery 2025 news in marathi nashik board advertisement for 478 houses last date to fill applications is 3rd october

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 11:13 AM

Topics:  

  • maharashtra
  • mhada
  • Nashik

संबंधित बातम्या

Amit Shah : नाशिकमधील २५ गावांतील ९,००० एकर जमिनीवर होणार वनीकरण, अमित शाहा यांची महत्त्वाची घोषणा
1

Amit Shah : नाशिकमधील २५ गावांतील ९,००० एकर जमिनीवर होणार वनीकरण, अमित शाहा यांची महत्त्वाची घोषणा

Amravati News: १ जानेवारीपासून ‘या’ जिल्ह्यात ‘बालविवाहमुक्त’, बालविवाह झाल्यास होणार कारवाई
2

Amravati News: १ जानेवारीपासून ‘या’ जिल्ह्यात ‘बालविवाहमुक्त’, बालविवाह झाल्यास होणार कारवाई

Pune Election : स्वबळाची भाषा बदलली; आता महायुतीच! शिंदे भाजपसोबतच महापालिका निवडणूक लढणार
3

Pune Election : स्वबळाची भाषा बदलली; आता महायुतीच! शिंदे भाजपसोबतच महापालिका निवडणूक लढणार

Pune Election : आता उमेदवार यादीची प्रतीक्षा, उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी
4

Pune Election : आता उमेदवार यादीची प्रतीक्षा, उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.