लंडनहून आणण्यात येणारी शिवाजी महाराज यांची वाघनखं कधी येणारा राज्यात
मुंबई : राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून लंडनहून वाघनखं घेऊन येणार असल्याची चर्चा आहे. याबाबत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार वर्षभरापासून पाठपुरवठा करत आहे. आज विधीमंडळामध्ये लंडनहून आणण्यात येणाऱ्या वाघनखांचा मुद्दा चर्चेसाठी आला होता. याबाबत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांबाबत विधानसभेत निवेदन सादर केलं. चर्चेवेळी मंत्री मुनगंटीवार यांनी संपूर्ण माहिती दिली आहे.
किती वेळ राहणार महाराष्ट्रात?
विधीमंडळामध्ये चर्चा करताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लंडनहून आणण्यात येणारी ही वाघनखं ही काळ महाराष्ट्रामध्ये असणार आहेत याबाबत माहिती दिली. सभागृहामध्ये ते म्हणाले, “ही वाघनखं लंडनला गेल्यानंतर ब्रिटनमध्ये प्रदर्शनातही ठेवण्यात आली होती. 1875 व 1896 साली हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यासंदर्भात तेव्हाच्या वर्तमानपत्रांतही बातम्या आल्या. त्यानुसार ही वाघनखं त्या संग्रहालयात असल्याचं सांगण्यात आलं. आपला पत्रव्यवहार पाहिल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा वर्षभरासाठी ही वाघनखं दर्शनासाठी देऊ असं सांगितलं. पण आम्ही पुन्हा प्रयत्न केला. त्यानंतर तीन वर्षांसाठी वाघनखं आपल्याकडे राहतील असा निर्णय झाला आहे, अशी माहिती मंत्री मुनगंटीवार यांनी दिली. त्यामुळे ही वाघनखं 3 वर्षासाठी महाराष्ट्रामध्ये असणार आहेत.
तसेच सुधीर मुनगंटीवार यांनी वाघनखं कधी आणणार याबाबत मोठी घोषणा केली. “येत्या १९ जुलैला हे वाघनख साताऱ्याच्या शासकीय म्युझियममध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व तिथले सरदार यांच्या उपस्थितीत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे”, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. त्यामुळे वाघनखं नेमकी कधी पाहायला मिळणार, याबाबतच्या प्रश्नांवर त्यांनी उत्तर दिलं आहे.
हीच ‘ती’ वाघनखं आहेत का?
राज्य सरकारकडून लंडनहून आणण्यात येणारी ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी हा दावा खरा नसून ही ती वाघनखं नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे विधीमंडऴामध्ये यावर देखील चर्चा झाली असून मंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. मुनगंटीवार म्हणाले, शिवभक्तांनी वाघनखांची माहिती दिली. आपण त्यासंदर्भातला पत्रव्यवहार सुरू केला. ती वाघनघं शिवभक्तांच्या दर्शनासाठी द्यावीत असा पत्रव्यवहार पंतप्रधान नरेंद्र मोदी, ब्रिटनचे पंतप्रधान आणि त्या संग्रहालयाच्या प्रमुखांशी केला. त्यांचं उत्तर आलं. 1825 रोजी बनवलेल्या डबीत ही वाघनखं ठेवली आहेत. त्या चित्रासह त्यांनी सर्व माहिती पाठवली, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.