फोटो सौजन्य: P P Cine Production (YouTube)
Khalid Ka Shivaji News Marathi: छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत. आजवर महाराजांच्या आयुष्यावर अनेक चित्रपट आली आणि ती गाजली सुद्धा. यामुळेच मध्यंतरी मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांचा ट्रेंडच आला होता. महाराजांचे चरित्र आजही अनेक वाट चुकलेल्या व्यक्तीला दिशा दाखवत असते. महाराजांनी जास्तीतजास्त लढाया या मुस्लिम राजवटींविरुद्ध केल्या. मात्र, याचा अर्थ असा होतो का की शिवराय मुसलमानाच्या विरोधात होते? याच गोष्टीवर बेतलेला सिनेमा म्हणजे खालिद का शिवाजी!
मराठी चित्रपटसृष्टी ही नेहमीच आपल्या वास्तविक आणि सामाजिक चित्रपटांमुळे ओळखली जाते. अभिमानाची बाब म्हणजे जिथे कमर्शियल चित्रपट भारत देशापुरतेच मर्यादित राहतात, तिथे आपला मराठी सिनेमा International Film Festivals मध्ये नावाजला जातो. नुकतेच, फ्रान्सच्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये खालिद का शिवाजी चित्रपटाची चर्चा झाली आहे.
‘रांझना हुआ मैं तेरा…’ धनुष नाही तर ‘हा’ अभिनेता ठरवण्यात आला होता रांझनाचा ‘लीड कास्ट’
ही कथा आहे खालिद नावाच्या एका मुलाची जो इयत्ता पाचवीत शिकत आहे. जन्माने तो मुसलमान असल्याने त्याच्या शाळेलतील मुलं त्याला अफझल खान म्हणून चिडवत असतात. यामुळे लहान असणाऱ्या खालिदच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात, ज्याची उत्तरे तो शोधायचा प्रयत्न करतो. या चित्रपटात खालिद त्याच्या प्रश्नातून शिवरायांना शोधण्याचा प्रयत्न करतो.
आताच्या जातीपाती आणि धर्माच्या आधारवर विभागलेल्या लोकांमध्ये एक मुस्लिम मुलगा शिवाजी महाराजांच्या जीवनमूल्यांचा शोध घेतो. ही कथाच एखाद्या व्यक्तीस हा चित्रपट पाहण्यास आकर्षित करणारी आहे. अभिमानाची बाब म्हणजे प्रतिष्ठित कान चित्रपट महोत्सवातील ‘मार्शे दु फिल्म’ (Marché du Film) या विभागात या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे.
देशातच नाही तर परदेशातही ‘Saiyaara’ ने मारली बाजी, ४०० कोटींच्या क्लबमध्ये चित्रपट सामील
हा चित्रपट विदर्भात शूट करण्यात आला असून अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील अनेक स्थानिक कलाकारांचा सहभाग यात पाहायला मिळतो. हा अस्सल वऱ्हाडी भाषेतला चित्रपट आहे ज्याने थेट फ्रांसमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
‘खालिद का शिवाजी’ चित्रपटामध्ये प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, सुषमा देशपांडे, कैलास वाघमारे, स्नेहलता तागडे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच चित्रपटातील खालिद हे महत्वाचं पात्र क्रिश मोरे याने साकारले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज प्रितम मोरे यांनी केले असून याचे लेखन कैलास वाघमारे यांनी केले आहे. लवकरच हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.