Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐन सणासुदीत साखरेला दरवाढीचा झटका, कृषीमंत्री भरणे म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच…’

साखरेच्या दरात अचानक वाढ झाल्याने सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. साखरेचा भाव 75 रुपयांपर्यंत पोहोचल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. साखरेच्या साठ्याअभावी कारखान्यांना आणि शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.

  • By विवेक
Updated On: Aug 23, 2026 | 05:30 PM
Dattatray Bharne

Dattatray Bharne

Follow Us
Follow Us:
  • सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात वाढ.
  •  ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही दरवाढीचा काही फायदा
  • आगामी काळात चांगला पाऊस पडण्याची गरज
 

सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीने सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी सुमारे 50 रुपये किलो दराने मिळणारी साखर आता 70 ते 80 रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. इथेनॉल उत्पादनामुळे साखरेच्या उपलब्धतेवर परिणाम झाल्याने दर वाढल्याचे बाजारातील जाणकारांचे मत आहे. दरम्यान, या वाढत्या दराचा काही प्रमाणात फायदा शेतकऱ्यांनाही होईल, असा दावा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला.

काय म्हणाले कृषिमंत्री भरणे ?

सोलापुरात बोलताना भरणे यांनी सांगितले की, साखरेचा भाव सध्या सुमारे 75 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. बँकांच्या कर्जामुळे अनेक साखर कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणात साखरेचा साठा उपलब्ध नसल्याचे त्यांनी नमूद केले. ज्या कारखान्यांकडे तुलनेने जास्त साठा आहे, त्यांना या दरवाढीचा अधिक फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर साखर साठवणुकीची क्षमता मर्यादित असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही या परिस्थितीचा काही लाभ मिळू शकतो, असे भरणे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल; एकनाथ शिंदेंचे ‘मिशन मोड’वर काम करण्याचे शिक्षण विभागाला निर्देश

आगामी काळात चांगला पाऊस पडण्याची गरज

दुसरीकडे, राज्यातील काही भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. धरणांमध्ये पाणी उपलब्ध असले तरी कालव्यांची क्षमता आणि वितरणाच्या मर्यादांमुळे गरजेनुसार सर्व भागांमध्ये पाणी पोहोचवणे शक्य होत नसल्याचे भरणे यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात चांगला पाऊस पडण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. पाऊस झाल्यास साठवण तलाव आणि पाझर तलाव भरतील आणि शेतकऱ्यांची चिंता काही प्रमाणात कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोठी बातमी ! बोगस लाडक्या बहिणींचा 9605 कोटींवर डल्ला; राज्य सरकार आता ‘त्या’ महिलांकडून पैसे करणार वसूल?

दरम्यान, निमगाव येथील वावडी महोत्सव आणि हिरकणी मेळाव्यात तरुणांशी संवाद साधताना भरणे यांनी आपल्या मोकळ्या स्वभावाबद्दलही भाष्य केले. आपल्या कृतीमुळे इतरांना आनंद मिळत असेल तर त्यात गैर काय, असा सवाल त्यांनी केला. वरातीत तरुणांसोबत नाचणे असो किंवा मुलांनी आग्रह केल्यावर त्यांच्यासोबत गोट्या खेळणे असो, लोकांना आनंद मिळत असेल तर आपणही त्यात सहभागी व्हावे, असे भरणे म्हणाले. ‘आयुष्य एकदाच मिळते; स्वतः आनंदी राहा आणि इतरांनाही आनंद द्या,’ असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

Web Title: Sugar price hike 75 rupees dattatray bharne farmers benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • Dattatray Bharane
  • Inflation
  • Sugar Price

संबंधित बातम्या

सणासुदीत साखरेचा गोडवा झाला कमी! ग्राहकांच्या बजेटवर वाढत्या दराचा भार; दर आणखी वाढण्याची शक्यता
1

सणासुदीत साखरेचा गोडवा झाला कमी! ग्राहकांच्या बजेटवर वाढत्या दराचा भार; दर आणखी वाढण्याची शक्यता

Food Inflation : कांदा, तेल, साखर आणि आता… किमती कडाडल्या, अचानक का वाढली महागाई? ऐन सणासुदीला बजेट कोलमडणार
2

Food Inflation : कांदा, तेल, साखर आणि आता… किमती कडाडल्या, अचानक का वाढली महागाई? ऐन सणासुदीला बजेट कोलमडणार

Sugar Price Hike: इथेनॉलमुळे वाढतेय साखरेची किंमत? सरकारने अखेर सांगितलं कारण, सामन्यांना माहीत हवेच
3

Sugar Price Hike: इथेनॉलमुळे वाढतेय साखरेची किंमत? सरकारने अखेर सांगितलं कारण, सामन्यांना माहीत हवेच

Sugar Prices Hike: साखरेच्या दराने गाठला नवा उच्चांक! सणासुदीत गोडवा महागणार?
4

Sugar Prices Hike: साखरेच्या दराने गाठला नवा उच्चांक! सणासुदीत गोडवा महागणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.