Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उजनीवरील खाजगी मासेमारी ठेका रद्द; मच्छीमारांना मोठा दिलासा, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश

Ujani Dam Private Fishing Contract Cancelled: उजनी धरणावरील खाजगी मासेमारी ठेक्याची ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पारंपरिक मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 05, 2026 | 08:13 PM
Ujani Dam Private Fishing Contract

Ujani Dam Private Fishing Contract

Follow Us
Follow Us:
  • मच्छीमारांच्या लढ्याला अखेर यश
  • उजनीवरील खाजगी मासेमारी ठेका रद्द
  • मच्छीमार बांधवांकडून आभार
इंदापूर : उजनी धरणावरील खाजगी मासेमारी ठेक्याची ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयामुळे उजनी धरण परिसरातील पारंपरिक मच्छीमार बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

Devendra Fadnavis : २०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे वक्तव्य

उजनी धरण परिसरातील हजारो मच्छीमार कुटुंबांचा पारंपरिक मासेमारी व्यवसाय हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार आहे. मात्र, धरणावरील खाजगी मासेमारी ठेक्यामुळे पारंपरिक मच्छीमारांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत इंदापूर तालुक्यातील मच्छीमार संघटना, महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समिती तसेच उजनी मच्छीमार बचाव अभियानाच्या वतीने ठेका प्रक्रियेला विरोध करण्यात आला होता. यासंदर्भात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे ठेका रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.

मच्छीमारांच्या मागणीसाठी संबंधित संघटनांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘थाळी बजाव’ आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर सिंचन भवन येथे आंदोलन करण्यात आले, तर उजनी तलावात जलसमाधी आंदोलन करून मच्छीमारांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते.या आंदोलनाची आणि मच्छीमारांच्या उपजीविकेच्या प्रश्नाची दखल घेत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणावरील खाजगी मासेमारी ठेका प्रक्रियेला तातडीने स्थगिती देऊन ती रद्द करण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली होती. त्यानंतर मच्छीमारांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी संबंधितांची बैठक घेण्यात आली.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उजनी धरणावरील खाजगी मासेमारी ठेका प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मच्छीमारांचा पारंपरिक व्यवसाय, त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह आणि भविष्यातील रोजगाराचा प्रश्न लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याने मच्छीमार समाजात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या बैठकीस ऑनलाईन हर्षवर्धन पाटील, आमदार अभिजित पाटील, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार संजय शिंदे, प्रधान सचिव एकनाथ डवले, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एस. डी. चोपडे, जलसंपदा विभाग पुणेचे मुख्य अभियंता प्रवीण कोल्हे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच मच्छीमार समाजाच्या वतीने उज्वला परदेशी, संजय दरदरे, चंद्रकांत भोई, बाळासाहेब काळे, अनिल नगरे, सिताराम नगरे, नंदकुमार नगरे, लक्ष्मण शिर्के, नितीन ईरीचे, युवराज नगरे, नवनाथ परदेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

उजनी धरणावर पारंपरिक पद्धतीने मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छीमारांच्या हिताचा विचार करून खाजगी मासेमारी ठेका प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने इंदापूर तालुक्यासह उजनी धरण परिसरातील मच्छीमार बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयासाठी मच्छीमार बांधवांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार मानले. पारंपरिक मच्छीमारांच्या उपजीविकेला संरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या लढ्याला या निर्णयामुळे महत्त्वाचे यश मिळाले असल्याची भावना मच्छीमार बांधवांनी व्यक्त केली.

Fresh And Nutritious Meals : विद्यार्थ्यांना ताजा पोषण आहार वेळेत मिळावा; जिल्हास्तरावर निर्णयाचे अधिकार देणार

Web Title: Ujani fishing contract e tender cancelled dattatray bharane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 08:13 PM

Topics:  

  • Dattatray Bharane
  • Fishermen community
  • Ujni

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.