सोलापूर : ऊसतोड ट्रॅक्टर चालक रमेश केशव मिसाळ (वय ३४ रा. खोकरमोहा ता. शिरूर कासार जि.बीड) याचा खून करून मृतदेह पोत्यात भरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुकादमासह पाच जणांना मंद्रूप पोलिसांनी अटक केले आहे.
याबाबत मंद्रूप पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंद्रूप येथील सीतामाई तलावाजवळ सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मुकादमच्या पत्नीला त्याचा मित्र ऊसतोड ट्रॅक्टर चालक यांनी वाईट बोलल्याने त्यांच्यात वाद चालू होता त्याच वेळी अभिमान साबळे, अशोक गिरी, मलप्पा कांबळे, मनीषा साबळे, अंजना गिरी यांनी त्यास मारहाण करु लागले. त्यावेळी अभिमान साबळे व अशोक गिरी याने
लाकडी काठी ने पाठीवर दोन्ही पायावर व दोन्ही हातावर मारहाण केल्याने मृत्यू झाला. या बाबतची फिर्याद बाळू भानुदास पवार, रा. पारडी (ता. लोहा जिल्हा नांदेड) यांनी मंद्रूप पोलिसात दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी भेट देऊन पाहणी केली. घटना स्थळावरून आरोपी अभिमान साबळे, अशोक गिरी (दोघे रा. मलकाचीवाडी ता. शिरूर कासार जि. बीड), मलप्पा कांबळे (रा. सादेपूर), मनीषा अभिमान साबळे, अंजना गिरी (दोघी रा. मलकाचीवाडी ता. शिरूर कासार जि. बीड) यांना ताब्यात घेऊन अटक केले आहे. पुढील तपास साहाय्य पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे हे करीत आहेत.