सोलापूर : माध्यमिक शिक्षण अधिकारी पदाचा पदभार सुलभा वटारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. भास्कर बाबर हे १५ दिवस वैद्यकीय रजेवर जात असल्याने त्यांचा पदभार वटारे यांना देण्यात आल्याची माहीती ॲडिशनल सीईओ चंचल पाटील यांनी दिली.
गेल्या अनेक दिवसापासून शिक्षण विभाग चर्चेत राहिला आहे. शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर हे कार्यालयात उपस्थित राहत नसल्याची ओरड शिक्षण संस्था चालक आणि शिक्षकांमध्ये होत होती. याबाबत अनेक तक्रारी सीईओ आणि शिक्षण संचालकाकडे करण्यात आल्या आहेत. बाबर यांच्या गैरहजेरीमुळे अनेकांचा हिरसमोड झाला आहे.