Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्याच्या विकासाला ‘स्पीड’! सुनेत्रा पवारांचा PMRDAला थेट आदेश; इनर रिंग रोड, मेट्रोसह पाणी-वाहतुकीवर मोठा फोकस

पुणे महानगर प्रदेशाच्या झपाट्याने होणाऱ्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी PMRDAच्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. इनर रिंग रोड, हिंजवडी मेट्रो, पाणीपुरवठा, नदी प्रदूषण आणि अग्निसुरक्षेवर विशेष भर देण्यात आला.

  • By विवेक
Updated On: Sep 10, 2026 | 10:11 PM
Sunetra Pawar

Sunetra Pawar

Follow Us
Follow Us:
  • पुणे इनर रिंग रोड आणि मेट्रोच्या कामांना गती देण्याचे निर्देश
  • इंद्रायणी, पवना, मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रणाला प्राधान्य
  • 674 गावांसाठी पाणी, वाहतूक आणि पायाभूत सुविधांचे दीर्घकालीन नियोजन
 

पुणे जिल्ह्याच्या नियोजित व सर्वांगीण विकासामध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, पीएमआरडीए क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज दिले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पीएमआरडीए क्षेत्रातील विविध विकासकामांचा आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला. यावेळी पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, सह आयुक्त (प्रशासन) रुपाली आवले-डंबे, सह आयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता, प्रभारी सह आयुक्त (अनधिकृत बांधकाम) हिम्मत खराडे, महानगर नियोजनकार स्मिता कलकुटकी, मुख्य अभियंता, अभियांत्रिकी विशेष प्रकल्प रिनाज पठाण, प्रभारी मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी यांच्यासह पीएमआरडीएचे संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते.

पमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात ६७४ गावांचा समावेश असून, सुमारे ५,२१५ चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश आहे. पुणे महानगर प्रदेशाचा झपाट्याने होत असलेला विस्तार, वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, नागरीकरण आणि पर्यटनाच्या वाढत्या संधी लक्षात घेऊन पुढील अनेक वर्षांचा विचार करून पायाभूत सुविधांचे नियोजन करावे.

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट, तातडीने दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार रुपये द्या- हर्षवर्धन सपकाळ

इनर रिंग रोडसह वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भर

पुणे इनर रिंग रोड, सीएमपी कॉम्प्रेहेंसिव्ह मोबिलिटी प्लॅन अंतर्गत प्रस्तावित प्रकल्प, हिंगणगाव पूल, यवत रेल्वे ब्रिज आदी प्रकल्पांना आवश्यक ती गती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुणे शहर आणि पीएमआरडीए क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध भागांना जोडणारी प्रभावी कनेक्टिव्हिटी विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मल्टिमोडल हब, औद्योगिक कनेक्टिव्हिटी, धार्मिक स्थळांची कनेक्टिव्हिटी, पर्यटन कनेक्टिव्हिटी तसेच विमानतळाशी जोडणी यांचा एकात्मिक विचार करून नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रोला गती

पुण्यातील माण–हिंजवडी परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता माण–हिंजवडी–शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन-३चे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. या २३ स्थानकांच्या मेट्रो मार्गिकेतील १२ स्थानके पूर्ण झाली असून, आणखी ५ स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. उर्वरित कामांना गती देऊन हा प्रकल्प नागरिकांच्या सेवेत लवकरात लवकर आणण्यासाठी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पांना सर्वोच्च प्राधान्य

पुणे महानगर प्रदेशातील इंद्रायणी, पवना, मुळा आणि मुठा नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठीचे प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत. नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी केवळ प्रकल्प उभारणे पुरेसे नसून, संबंधित यंत्रणा आणि संस्था स्वयंपूर्ण व आर्थिकदृष्ट्या शाश्वत होणे आवश्यक आहे. भविष्यातील देखभाल-दुरुस्ती आणि संचालनाचा खर्चही सक्षमपणे भागवता येईल, अशा पद्धतीने प्रकल्पांचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

अग्निशमन केंद्रांचे जाळे अधिक सक्षम करण्याच्या सूचना

पीएमआरडीए क्षेत्रातील वाढते नागरीकरण आणि लोकसंख्येचा विस्तार लक्षात घेऊन अग्निसुरक्षेची यंत्रणा सक्षम करण्यावरही बैठकीत चर्चा झाली. कासार आंबोली येथील अग्निशमन केंद्राचे काम प्रगतीपथावर असून, आणखी १२ अग्निशमन केंद्रे प्रस्तावित आहेत. या केंद्रांच्या कामांना आवश्यक ती गती देऊन पीएमआरडीए क्षेत्रातील नागरिकांना तत्पर अग्निशमन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.

Eknath Shinde : लंडनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये एकनाथ शिंदेंचा गौरव; ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी दुमदुमली ब्रिटिश संसद

वाढत्या लोकसंख्येसाठी पिण्याच्या पाण्याचे दीर्घकालीन नियोजन

पीएमआरडीए क्षेत्रात वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि भविष्यातील नागरी विस्तार लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आतापासूनच दीर्घकालीन नियोजनातून सोडवावा त्यासाठी नवीन पाण्याची स्त्रोत उपलब्ध करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. नवीन नागरी वसाहती, औद्योगिक क्षेत्रे, पर्यटनस्थळे आणि वाढणाऱ्या लोकसंख्येला आवश्यक पाणीपुरवठा उपलब्ध होण्यासाठी उपलब्ध जलस्रोत, वितरण व्यवस्था आणि भविष्यातील गरजा यांचा एकत्रित विचार करून नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

पुणे महानगर प्रदेशाचा विकास हा केवळ रस्ते आणि इमारतींपुरता मर्यादित न राहता वाहतूक, पाणी, पर्यावरण, अग्निसुरक्षा, उद्योग, पर्यटन आणि नागरिकांच्या जीवनमानाचा सर्वंकष विचार करणारा असावा, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी दिल्या.

Web Title: Sunetra ajit pawar pmrda pune development inner ring road metro

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 10:11 PM

Topics:  

  • Maharashtra Governement
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा! स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर; दिलीप वळसे पाटील यांची माहिती
1

आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा! स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर; दिलीप वळसे पाटील यांची माहिती

Bandkhor Marathi Movie: अन्यायाविरोधात पेटल्या सहा स्त्रिया, उचललं बंडाचं पाऊल; ‘बंडखोर’चा दमदार ट्रेलर रिलीज!
2

Bandkhor Marathi Movie: अन्यायाविरोधात पेटल्या सहा स्त्रिया, उचललं बंडाचं पाऊल; ‘बंडखोर’चा दमदार ट्रेलर रिलीज!

हिंजवडीच्या वाहतूक कोंडीला कायमचा पूर्णविराम! ‘पीएमआरडीए’चा 2182 कोटींचा मास्टर प्लॅन
3

हिंजवडीच्या वाहतूक कोंडीला कायमचा पूर्णविराम! ‘पीएमआरडीए’चा 2182 कोटींचा मास्टर प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.