Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा! स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर; दिलीप वळसे पाटील यांची माहिती

पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी ४ कोटी ९६ लाख ८९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 09, 2026 | 12:30 AM
आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा! स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर; दिलीप वळसे पाटील यांची माहिती

आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा! स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर; दिलीप वळसे पाटील यांची माहिती

Follow Us
Follow Us:

मंचर : पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी ४ कोटी ९६ लाख ८९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ‘दिशा कृषी उन्नतीची-२०२९’ या उपक्रमांतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत हा निधी मंजूर झाला आहे. याचा थेट लाभ जुन्नर, आंबेगाव, खेड आणि मावळ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना मिळणार आहे, अशी माहिती माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी अनुदानित प्रात्यक्षिक संच देण्यात येणार आहेत. तसेच पाण्याचा शाश्वत स्रोत निर्माण करण्यासाठी प्लास्टिक अस्तरीकरणासह नवीन शेततळी उभारण्यात येतील. जुन्या शेततळ्यांना प्लास्टिक अस्तरीकरण तसेच सुरक्षिततेसाठी कुंपण करण्याची कामेही केली जाणार आहेत. या निधीसाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रशासकीय मान्यतेचे आदेश व शुद्धिपत्रक काढण्यात आले आहे. आंबेगाव तालुक्यात यापूर्वी न्यूक्लिअस अर्थसंकल्पातून स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग करण्यात आला होता. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवीन पर्याय उपलब्ध झाला. या निर्णयामुळे चारही तालुक्यांतील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, त्यांना पारंपरिक शेतीसोबत नगदी पिकांचा पर्याय मिळावा आणि पाण्याची शाश्वत व्यवस्था निर्माण व्हावी, हा या योजनेचा उद्देश आहे. स्ट्रॉबेरी लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला निश्चितच चालना मिळेल. -दिलीप वळसे पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष.

आंबेगावच्या रस्त्यांसाठी ६ कोटी २५ लाखांचा निधी

आंबेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते अधिक मजबूत व सुरक्षित करण्यासाठी ‘३०५४ रस्ते विकास व मजबुतीकरण’ लेखाशीर्षांतर्गत सन २०२६-२७ मधील ११ विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ६ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिली. या निधीतून अवसरी खुर्द, पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे, म्हाळुंगे पडवळ आणि निरगुडसर या गावांतील अंतर्गत तसेच जोडरस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. अवसरी खुर्द येथील तीन कामांसाठी १ कोटी ४५ लाख रुपये,पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे येथील तीन कामांसाठी २ कोटी ८५ लाख रुपये, म्हाळुंगे पडवळ येथील चार कामांसाठी १ कोटी २५ लाख रुपये, तर निरगुडसर येथील एका रस्त्यासाठी ७० लाख रुपये रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्यांच्या कामांमुळे शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला तसेच नागरिकांची वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून वाहतुकीच्या समस्या कमी करण्यासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया व प्रत्यक्ष अंमलबजावणी लवकर पूर्ण करावी, अशी अपेक्षा वळसे पाटील यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच, नियमांचे उल्लंघन करणारे डीजे जप्त करणार; बारामती तालुका पोलिसांचा इशारा

Web Title: Dilip walse patil announced that funds have been sanctioned for strawberry cultivation by tribal farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Farmers
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Dharashiv News: शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका; पीकविमा, अनुदानासह तातडीच्या मदतीची काँग्रेसची मागणी
1

Dharashiv News: शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका; पीकविमा, अनुदानासह तातडीच्या मदतीची काँग्रेसची मागणी

Bail Pola Festival: चारा-पाण्याची टंचाई अन् खिशाला महागाईचा फटका; अहिल्यानगरमध्ये बैलपोळ्याचा बाजार थंडावला
2

Bail Pola Festival: चारा-पाण्याची टंचाई अन् खिशाला महागाईचा फटका; अहिल्यानगरमध्ये बैलपोळ्याचा बाजार थंडावला

Bandkhor Marathi Movie: अन्यायाविरोधात पेटल्या सहा स्त्रिया, उचललं बंडाचं पाऊल; ‘बंडखोर’चा दमदार ट्रेलर रिलीज!
3

Bandkhor Marathi Movie: अन्यायाविरोधात पेटल्या सहा स्त्रिया, उचललं बंडाचं पाऊल; ‘बंडखोर’चा दमदार ट्रेलर रिलीज!

Buldhana News: खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव, महिनाभरापासून पावसाची दडी; तुषार सिंचनावर पीक जगवण्याची धडपड
4

Buldhana News: खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव, महिनाभरापासून पावसाची दडी; तुषार सिंचनावर पीक जगवण्याची धडपड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.