Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bandkhor Marathi Movie: अन्यायाविरोधात पेटल्या सहा स्त्रिया, उचललं बंडाचं पाऊल; ‘बंडखोर’चा दमदार ट्रेलर रिलीज!

Bandkhor Marathi Movie: महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘बंडखोर’ चित्रपटाचा ट्रेलर सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत लॉन्च झाला. सहा स्त्रियांच्या संघर्षाची कहाणी २४ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 08, 2026 | 11:39 AM
(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Bandkhor Marathi Movie:  एका स्त्रीच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय हा तिचा स्वतःचा असतोच असं नाही. कधी कुटुंब, नाती, समाज तर कधी परिस्थिती तिच्यासाठी निर्णय घेत असते. मात्र, जेव्हा तीच स्त्री अन्यायाविरोधात आवाज उठवत स्वतःच्या आयुष्याची सूत्रं आपल्या हातात घेते, तेव्हा सुरू होतो तिचा खरा बंड. अशाच सहा स्त्रियांच्या संघर्षाची आणि त्यांच्या निर्णयांची कहाणी सांगणाऱ्या ‘बंडखोर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या वेळी स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष आणि बंडखोरी करणाऱ्या महाराष्ट्रातील काही महिलांचा विशेष सन्मानही करण्यात आला.

सहा स्त्रिया, सहा संघर्ष आणि एकच बंड

‘बंडखोर’च्या ट्रेलरमध्ये छाया कदम, प्रियदर्शनी इंदलकर, मृणाल कुलकर्णी, पूजा कातुर्डे, तितिक्षा तावडे आणि नित्यश्री ज्ञानलक्ष्मी यांच्या व्यक्तिरेखांची झलक पाहायला मिळते. या सहाही स्त्रियांची आयुष्यं वेगवेगळी आहेत. मात्र, त्यांच्या वाट्याला आलेली परिस्थिती त्यांना एका समान टप्प्यावर आणून उभी करते.

आपल्यावर लादलेलं आयुष्य जगण्यापेक्षा स्वतःच्या अस्तित्वासाठी प्रश्न विचारण्याची आणि त्यांची उत्तरं शोधण्याची वेळ या सहा जणींवर येते. त्यामुळे त्यांचं ‘बंडखोर’ होणं ही केवळ एका क्षणाची प्रतिक्रिया नसून, त्यामागे अनेक वर्षांचे अनुभव, भावना आणि संघर्ष दडलेले आहेत.

ट्रेलरमधील संवाद, प्रसंग आणि व्यक्तिरेखांमधील नातेसंबंधांमुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. या सहा स्त्रिया कोणत्या परिस्थितीतून जातात, कोणत्या घटना त्यांना निर्णय घेण्यास भाग पाडतात आणि स्वतःसाठी घेतलेल्या निर्णयांची त्यांना कोणती किंमत मोजावी लागते, हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Zee Marathi New Serial: ‘चाल तिची अंगार, नजरेची तलवार…’; झी मराठीच्या नव्या मालिकेतील ‘ती’ अभिनेत्री कोण? चाहत्यांनी सांगितलं नाव

सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या…

ट्रेलर लॉन्च सोहळ्यात सुनेत्रा अजित पवार यांनी ‘बंडखोर’मधील सहा स्त्रिया अनेक महिलांना प्रेरणा देतील, असा विश्वास व्यक्त केला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख करत त्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारं खुली करण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची आठवण करून दिली.

‘बंडखोर’च्या ट्रेलरमधून समाजातील प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अनेक प्रश्न मांडलेले दिसतात. आपल्या मतांवर ठाम राहून अन्यायाविरोधात उभं राहण्याची प्रेरणा हा चित्रपट देईल, असंही त्यांनी सांगितलं.

सुनील गावस्करांनी सांगितली ‘बंडखोर’ स्त्रीची गोष्ट

ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आपल्या आयुष्यातील ‘बंडखोर’ स्त्री म्हणून आपल्या आईचा उल्लेख केला. क्रिकेट आणि शिक्षणाच्या बाबतीत आईने दिलेल्या पाठिंब्यामुळेच आपण घडलो, असं त्यांनी सांगितलं.

त्या काळात क्रिकेटला फारसं सुरक्षित करिअर मानलं जात नव्हतं. मात्र, आपल्या क्रिकेटमधील आवड ओळखून आईने आपल्याला प्रोत्साहन दिलं आणि त्यासोबत शिक्षणाचं महत्त्वही पटवून दिलं, अशी आठवण गावस्करांनी सांगितली. आपल्या आयुष्यात साथ देणाऱ्या पत्नीचाही आपल्या वाटचालीत मोठा वाटा असल्याचं त्यांनी नमूद केलं.

महेश मांजरेकर म्हणाले, ‘बंडखोर’ म्हणजे अन्यायाविरोधात आवाज उठवणारी स्त्री

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या मते, ‘बंडखोर’ हा शब्द अनेकदा नकारात्मक अर्थाने वापरला जातो. मात्र, त्यांच्या दृष्टीने बंडखोर म्हणजे अन्यायाविरोधात आवाज उठवणारी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी ठामपणे उभी राहणारी स्त्री.


Toxic Ott Release: ‘टॉक्सिक’ची OTT डील अडकली! मेकर्सची 200 कोटींची मागणी, प्लॅटफॉर्मने कमी केली ऑफर

आपल्या मोठ्या मुलीच्या स्वभावातूनच या चित्रपटाची कल्पना सुचल्याचं मांजरेकरांनी सांगितलं. आपल्या आयुष्यात आई, पत्नी आणि मुलींनी आपल्याला घडवलं असून, वेगवेगळ्या स्त्रियांच्या आयुष्यात पाहिलेल्या संघर्षातून ‘बंडखोर’ची कथा आकाराला आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

२४ सप्टेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार

संजय शेटये यांच्या विनसन ग्राफिक प्रोडक्शन निर्मित आणि सत्यसाई फिल्म्स प्रस्तुत ‘बंडखोर’चे संवाद लेखन सिद्धार्थ साळवी आणि इरावती कर्णिक यांनी केलं आहे.

सहा स्त्रियांच्या आयुष्यातील वेगवेगळे संघर्ष, त्यांचे निर्णय आणि स्वतःसाठी उभं राहण्याची त्यांची कहाणी सांगणारा ‘बंडखोर’ २४ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Bandkhor marathi movie trailer mahesh manjrekar release date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • mahesh manjrekar
  • marathi movie
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

‘Majha Chhakula Hasya Jatra Frame: ‘माझा छकुला’ मधला तो हमाल आठवतोय का? दुसरा तिसरा कोणी नसून ‘हास्यजत्रा’ फेम ‘हा’ कलाकार
1

‘Majha Chhakula Hasya Jatra Frame: ‘माझा छकुला’ मधला तो हमाल आठवतोय का? दुसरा तिसरा कोणी नसून ‘हास्यजत्रा’ फेम ‘हा’ कलाकार

Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क सोन्याच्या भावात! कडीपत्त्याची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल
2

Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क सोन्याच्या भावात! कडीपत्त्याची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल

Devghar On Rent: अध्यात्माच्या दारात दडलंय कोणतं गूढ? ‘देवघर ऑन रेंट’चा थरारक टिझर रिलीज
3

Devghar On Rent: अध्यात्माच्या दारात दडलंय कोणतं गूढ? ‘देवघर ऑन रेंट’चा थरारक टिझर रिलीज

हिंजवडीच्या वाहतूक कोंडीला कायमचा पूर्णविराम! ‘पीएमआरडीए’चा 2182 कोटींचा मास्टर प्लॅन
4

हिंजवडीच्या वाहतूक कोंडीला कायमचा पूर्णविराम! ‘पीएमआरडीए’चा 2182 कोटींचा मास्टर प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.