Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिंजवडीच्या वाहतूक कोंडीला कायमचा पूर्णविराम! ‘पीएमआरडीए’चा 2182 कोटींचा मास्टर प्लॅन

कामावर जाताना आणि सुटताना भुजबळ चौक ते विप्रो सर्कलदरम्यान तासनतास अडकून पडणाऱ्या लाखो आयटीयन्सची या दैनंदिन त्रासातून सुटका करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) कंबर कसली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 06, 2026 | 12:30 AM
हिंजवडीच्या वाहतूक कोंडीला कायमचा पूर्णविराम! 'पीएमआरडीए'चा 2182 कोटींचा मास्टर प्लॅन

हिंजवडीच्या वाहतूक कोंडीला कायमचा पूर्णविराम! 'पीएमआरडीए'चा 2182 कोटींचा मास्टर प्लॅन

Follow Us
Follow Us:

पिंपरी : देश-विदेशातील नामांकित आयटी कंपन्यांचे केंद्र असलेल्या हिंजवडी राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानाची (आयटी पार्क) ओळख आता केवळ तंत्रज्ञानापुरती मर्यादित न राहता, तिथल्या जीवघेण्या वाहतूक कोंडीसाठीही होऊ लागली आहे. कामावर जाताना आणि सुटताना भुजबळ चौक ते विप्रो सर्कलदरम्यान तासनतास अडकून पडणाऱ्या लाखो आयटीयन्सची या दैनंदिन त्रासातून सुटका करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) कंबर कसली आहे. संपूर्ण परिसराचा कायापालट करणारा तब्बल २ हजार १८२ कोटी ७९ लाख रुपयांचा महत्त्वाकांक्षी ‘मास्टर प्लॅन’ प्राधिकरणाने आखला असून, यामुळे हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील वाहतुकीचे जाळे आमूलाग्र बदलणार आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाल्याने कागदावरचा हा आराखडा लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे.

१,७५६ कोटींतून उभे राहणार ६ पर्यायी जोडरस्ते

हिंजवडीतील वाहतूक कोंडीचे मुख्य केंद्र असलेल्या भुजबळ, भूमकर आणि लक्ष्मी चौकांवरील ताण विभागण्यासाठी १७.७४ किलोमीटर लांबीचे सहा स्वतंत्र जोडरस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. या प्रकल्पात भूसंपादनावर १,२६४ कोटी ५३ लाख, तर बांधकामावर ४४२ कोटी २६ लाख रुपये खर्च केले जातील.

प्रस्तावित ६ जोडरस्ते आणि तरतूद

मेझा-९ हॉटेल – लक्ष्मी चौक – मारुंजी – कोलते पाटील गेट: ४ किमी (३६ मीटर रुंद) – रु. ४५२.५५ कोटी
सूर्या हॉस्पिटल ते ठाकर वस्ती: ३.७४ किमी (२४ मीटर रुंद) – रु. ३८५.४३ कोटी
नांदे ते माण गावठाण: १.८२ किमी (३६ मीटर रुंद) – रु. ३६०.३७ कोटी
शनि मंदिर (वाकड) ते मारुंजी: ३.५१ किमी (१८ मीटर रुंद) – रु. २४७.७६ कोटी
ठाकर वस्ती ते माण गावठाण: ३.४८ किमी – रु. १४४.०२ कोटी
सूर्या हॉस्पिटल ते साखरे वस्ती (फेज-१): १.३९ किमी (१५ मीटर रुंद) – रु. ११६.६६ कोटी

मेट्रो ते थेट कंपनी : ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’साठी ४२६ कोटी

केवळ मुख्य रस्ते रुंद न करता, मेट्रोने येणाऱ्या कर्मचाऱ्याला थेट कार्यालयापर्यंत निर्विघ्न पोहोचता यावे, यासाठी मेट्रोच्या ५०० मीटर ते १.५ किलोमीटर परिसरातील २७.६ किलोमीटर लांबीचे अंतर्गत रस्ते विकसित केले जाणार आहेत. यासाठी ४२६ कोटी रुपयांचा स्वतंत्र निधी दिला आहे.

पहिला टप्पा : माण डेपो ते हिंजवडी स्टेशन (मेगापॉलिस सर्कल ते वाकड पूल) या मेट्रो कॉरिडॉरलगतच्या १० किमी लांबीच्या रस्त्यांचा विकास. यातील ८.५ किमी काम एमआयडीसीमार्फत २०० कोटींतून पूर्ण होणार आहे.

आधुनिक सोयी-सुविधा : हे रस्ते केवळ वाहनांपुरते मर्यादित नसून त्यावर अत्याधुनिक पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, पथदिवे, बसथांबे, रिक्षा थांबे, ‘अर्बन लाउंज’ आणि भविष्यातील कामांसाठी भूमिगत डक्टची व्यवस्था असेल.

२० अंतर्गत रस्त्यांचे सक्षमीकरण : मेट्रो स्थानकांच्या परिसरातील २० रस्त्यांच्या रुंदीकरण व डांबरीकरणासाठी २२६.५४ कोटी रुपये खर्चून कामे केली जातील.

हे सुद्धा वाचा : पुण्यातील ‘या’ भागातील रस्त्यांची दुरावस्था; प्रशासनाच्या कारभारावर सुप्रिया सुळेंचा सवाल

प्रमुख चौकांची कोंडीतून सुटका

एकूण ४५.३४ किलोमीटर रस्त्यांच्या विकासामुळे भुजबळ चौक, भूमकर चौक, लक्ष्मी चौक, शिवाजी चौक आणि विप्रो सर्कल या प्रमुख बॉटलनेक्सवरील वाहनांची गर्दी थेट विभागली जाईल. याशिवाय मेगापॉलिस, क्वाड्रॉन, डोहलर, इन्फोसिस फेज-२ आणि पॉल इंडिया या मेट्रो स्थानकांलगतच्या जोडणीमुळे हजारो खासगी वाहने रस्त्यावरून कमी होऊन सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढण्यास थेट मदत होईल.

Web Title: Pmrda is working on a plan to construct roads to resolve traffic congestion in hinjawadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • PMRDA
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Supriya Sule : पुण्यातील ‘या’ भागातील रस्त्यांची दुरावस्था; प्रशासनाच्या कारभारावर सुप्रिया सुळेंचा सवाल
1

Supriya Sule : पुण्यातील ‘या’ भागातील रस्त्यांची दुरावस्था; प्रशासनाच्या कारभारावर सुप्रिया सुळेंचा सवाल

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
2

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल
3

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

Sunetra Pawar on Supriya Sule : ‘अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण करू नका,’ सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला
4

Sunetra Pawar on Supriya Sule : ‘अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण करू नका,’ सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.