पुणे : पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना नोटीस पाठवल्याचा दावा केला होता. त्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेत थेट टिंगरेंनी पाठवलेली नोटीसच दाखवली.त्यावरून सुप्रिया सुळे यांनी सुनील टिंगरेंवर निशाणा साधला आहे.
सुनील टिंगरे यांनी पाठवलेल्या नोटीसीतील मजकुराचा उल्लेख करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवार हे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत ती नोटीस त्यांनाच पाठवण्यात आली आहे. पुण्यात पोर्शे कारचा अपघात झाला होता. दुर्देवाने त्या दोन युवकांची हत्या झाली. त्याच्या सर्व बातम्या वर्तमानपत्रात, टिव्ही चॅनेल्सवर प्रसिद्ध झाल्या आहेत. अपघतानंतर हे सर्वजण पोलीस स्टेशनला गेल्याचे पोलिसांनीही मान्य केलं होतं आणि त्यांची आम्ही माफी मागावी. आम्ही त्यांच्यावर टीका केली तर त्यांनी आमच्यावर दिवाणी आणि फौजदारी कारवाई करण्याची नोटीस पाठवली जाते. पोलिसांच्या आणि वर्तमान पत्रांनी, टिव्ही चॅनेल्सने दिलेल्या बातम्यांवर आम्ही यावर बोललो, हे बोलणं जर या देशात गुन्हा असेल तर हा गुन्हा आम्हाला मान्य आहे. अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांनी ही नोटीस पाठवली आहे.
हेही वाचा : आतापर्यंत पक्षांचे आता थेट मतदारांचा जाहीरनामा…; खडकवासलामधील जाहीरनामा तुफान व्हायरल
शरद पवार आणि आम्हाला ही नोटीस पाठवली आहे, पोलिसांनी, प्रसारमाध्यमांनी बातम्या दाखवल्या होत्य़ा हे सर्व आम्ही लोकशाहीला धरून केलं आहे. पण तरीही आम्हाला नोटीस पाठवली आहे. ही तर थेट धमकीच आहे की कोणत्याही अटीशर्थींशिवाय माफी मागण्यास सांगण्यात आले आहे. ही दंतकथा नाही, हे सत्य आहे. त्यावर अजित पवारांची सही आहे.
धनंजय महाडिकांच्या अशा वक्तव्यांचा मी जाहीर निषेध करते.खरंतर महाडिकांना नेमकं काय झालयं मला माहिती नाही, आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केलंय, आपल्या मुलांची संगत चांगली असावी असं म्हणतात, तेच संस्कार होत असतात, जे अनेक वर्षे आमच्यासोबत अत्यंत सुस्कृंतपणे वागले, पण आता त्यांनाकाय झालय हा संगतीचा परिणाम दिसत आहे. ते ज्याप्रमाणे महिलांना धमकावत होते,मी जाहीपणे त्यांच्या वक्तव्याचा निषेध करते. त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ कोणीही काढला नाही, त्यातच छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये महिलांना धमकावले जात आहे. पण तुम्ही काय तुमच्या खिशातून पैसे देत आहात का, आम्ही जो टॅक्स भरतो त्यातून तुम्ही ती योजना चालते. हे भाजप किंवा कुणाच्या खिशातून पैसे देत नाही. देत आहात तर उपकार करत नाहीत तुम्ही.
हेही वाचा : फिल्म इंडस्ट्री सोडणाऱ्या किरण मानेला ‘या’ अभिनेत्याने दिली होती कठीण काळात साथ
कुठलीही महिला, कुठल्याही पक्षाच्या जाहीर सभेला जाऊ शकते हा तिचा संविधानने दिलेला अधिकार आहे. कोणतीही महिला तिच्या आवडीच्या पक्षाच्या कार्यक्रमाला जाऊ शकते. त्यांनी अडवून दाखवावे, एकच महिला जर ती काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उदधव ठाकरे यांच्या पक्षाच्या कार्यक्रमाला गेली आणि तुम्ही त्या महिलेचे फोटो काढले तिचे काही बरवाईट केंल, तिच्या हक्काचा योजनेमधला निधी बंद केला तर गाठ आमच्याशी आहे. मी कोर्टात खेचीन आणि भाजपमध्ये महिलांच्या बाबतीत जो गलिच्छपणा सुरू आहे, त्यातून तुम्हाला भाजपचा खरा चेहरा दिसतो. ही धमकी आहे. महाराष्ट्रातील कुठलीही महिला अशी धमकी खपवून घेणार नाही., आम्ही स्वाभिमानी आहोत. याची दखल महिला आयोगानेही घेतली पाहिजे.