Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 2 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“पप्पू सिर्फ पास नही हुआ,पप्पू मेरीट मे आ रहा है”, कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर सुषमा अंधारेंचा भाजपला टोला

सुषमा अंधारे म्हणाल्या की, कर्नाटकचा निकाल देशभरात मोदी है तो मुमकिन हैं, असं म्हणणाऱ्यांसाठी चपराक आहे. गेल्या नऊ वर्षात मोदींनी प्रचंड नकारात्मकतेच हेट पॉलिटिक्स पसरवलं आहे.

  • By साधना
Updated On: May 13, 2023 | 01:43 PM
sushma andhare

sushma andhare

Follow Us
Follow Us:

नागपूर: कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. (Karnataka Elections Result) कर्नाटकात 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान (Voting) झाले. एकूण 73.19 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकांपेक्षा मतदानाचा टक्का 1 टक्क्यांनी वाढलेला आहे. दरम्यान कर्नाटकमध्ये काँग्रेस 130 जागांवर आघाडीवर आहे. याविषयी आता शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या नागपूरमध्ये बोलत होत्या.

पप्पू सगळ्यांचा बाप निघाला
राहुल गांधींवर टीका करणाऱ्या भाजपविषयी अंधारे म्हणाल्या की, राहुल गांधीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, त्यांच्यासोबत नेहरू, गांधी त्यांच्या सगळ्या परिवाराची इमेज खराब करण्याचा प्रयत्न भाजपाकडून सातत्याने झाला.  परंतु ज्या भाजपा स्लीपर सेलने राहुल गांधी यांना पप्पू ठरविण्याचे प्रयत्न केले. तो पप्पू सगळ्यांचा बाप निघाला, पप्पू सिर्फ पास नही हुआ, पप्पू मेरीट मे आ रहा है,असं त्या म्हणाल्या.

मोदींनी देशात पसरवलं हेट पॉलिटिक्स
सुषमा अंधारे म्हणाल्या की, हे निकाल देशभरात मोदी है तो मुमकिन हैं, असं म्हणणाऱ्यांसाठी चपराक आहे. गेल्या नऊ वर्षात मोदींनी प्रचंड नकारात्मकतेच हेट पॉलिटिक्स पसरवलं आहे. त्याला लोक कंटाळलेले आहेत. बेरोजगारी, महागाई याचा ग्रोथ रेट सगळेच बघत आहेत कर्नाटकमधील जनता सुजाण आहे. दक्षिण भारतीय प्रगत विचारधारेचे आहे. या येणाऱ्या निकालाचा फायदा आणि नवी ऊर्जा येणाऱ्या काळात महाराष्ट्रात पाहायला मिळेल.

धर्माच्या नावावर मतं मागण्याची भाजपची सवय
धर्माच्या नावाने मत मागणे, ही भाजपची फार जुनी सवय आहे. जेव्हा भाजप वेगवेगळ्या आघाडीवर अपयशी ठरते , तेव्हा तेव्हा भाजप महापुरुषांच्या फोटो आड लपण्याचा प्रयत्न करते. महाराष्ट्रामध्ये सावरकर गौरव यात्रा काढण्याचा प्रयत्न झाल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.

Web Title: Sushma andhare reaction after karnataka election results 2023 nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2023 | 01:29 PM

Topics:  

  • Congress
  • Karnataka Election 2023
  • sushma andhare

संबंधित बातम्या

खासदार सुनील तटकरे यांना मोठा धक्का! भाचे अमोल महाडिकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
1

खासदार सुनील तटकरे यांना मोठा धक्का! भाचे अमोल महाडिकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

‘विद्यार्थ्यांवरील अत्याचाराला अमित शाहच जबाबदार’, मल्लिकार्जुन खरगेंचा थेट हल्लाबोल, गृहमंत्र्यांविरोधात केली ‘ही’ तात्काळ मागणी
2

‘विद्यार्थ्यांवरील अत्याचाराला अमित शाहच जबाबदार’, मल्लिकार्जुन खरगेंचा थेट हल्लाबोल, गृहमंत्र्यांविरोधात केली ‘ही’ तात्काळ मागणी

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! ‘या’ घोटाळा प्रकरणात माजी पंतप्रधान Manmohan Singh यांना क्लीन चिट; काय होते प्रकरण?
3

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! ‘या’ घोटाळा प्रकरणात माजी पंतप्रधान Manmohan Singh यांना क्लीन चिट; काय होते प्रकरण?

Shrikant Shinde: अरे ऐकून घे ना राहुल, का ओरडतोय…; लोकसभेत श्रीकांत शिंदे कडाडले अन् क्षणार्धात वातावरण… पाहा Video
4

Shrikant Shinde: अरे ऐकून घे ना राहुल, का ओरडतोय…; लोकसभेत श्रीकांत शिंदे कडाडले अन् क्षणार्धात वातावरण… पाहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.