Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सरकारचा पहिला मोठा निर्णय, परमबीरसिंह यांचे निलंबन मागे, महाविकास आघाडीला मोठा धक्का

राज्याच्या इतिहासातील सर्वात हायहोल्टेज राजकीय उलथापालथीचा निकाल काल लागला. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला निकाल काल सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्याच्यावर अनेक मतमतांतरे दिग्गज व्यक्तींकडून व्यक्त होत आहेत. असे असताना शिंदे-फडणवीस सरकारने परमबीरसिंह यांचे निलंबन मागे घेऊन, पुन्हा एकदा मविआला धक्का दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला अडचणीत आणणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत आणणे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. त्यामुळे याच्यावर मविआच्या नेत्यांकडून निश्चित प्रतिक्रिया येणार पाहुया यावरील सविस्तर रिपोर्ट

  • By युवराज भगत
Updated On: May 12, 2023 | 04:03 PM
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सरकारचा पहिला मोठा निर्णय, परमबीरसिंह यांचे निलंबन मागे, महाविकास आघाडीला मोठा धक्का
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणणारे पोलीस अधिकारी म्हणून परमबीरसिंह यांना ओळखले जाते. हे तेच पोलीस अधिकारी आहेत, ज्यांनी मविआच्या गृहमंत्र्यांवर 100 कोटींचा वसुली प्रकरणी गंभीर आरोप केला होता. यावर राज्याच्या गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर त्यांना तुरुंवाससुद्धा भोगावा लागला होता.

Maharashtra government drops all charges against former Mumbai police commissioner Param Bir Singh. The state government also quashed the suspension orders issued in December 2021 and said that he was on duty during the period of suspension. pic.twitter.com/7ER4Vj21ZQ

— ANI (@ANI) May 12, 2023

परमबीर सिंग प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी आता सीबीआयचे लक्ष्य ठरले आहेत. 100 कोटी वसुली प्रकरणाचा तपास करणाऱ्या सर्व तपास अधिकाऱ्यांना सीबीआय समन्स पाठवणार आहे. हे सगळे राज्य सरकारने नियुक्त केलेले तपास अधिकारी असून सीआयडी, गुन्हे शाखा किंवा ठाणे पोलिसांत ते सध्या कार्यरत आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मुंबईचे पोलीस आयुक्त असताना आपल्याला अवैधरीत्या मुंबई मधील बार मालकाकडून 100 कोटी रुपये जमा करण्यात सांगितले. अशा प्रकारचे खळबळजनक पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. तसेच आपण केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी, यासाठी परमबीर सिंग यांनी सर्वात आधी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिल्यानंतर, परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका केली होती.

चौकट 

अरविंद सावंत प्रतिक्रिया – या लोकांना अशीच भ्रष्ट माणसे लागतात. त्यांची ही कृती अत्यंत  सौदेबाजी आणि निर्लज्जपणाचा हा कळस आहे. यांना विरोधी पक्षांना त्रास देणारी भ्रष्ट माणसे जवळ लागतात.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील गुन्हे

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात ठाणे नगर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असून त्याचा तपास पोलिस करत आहेत. ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या वसुलीच्या गुन्ह्याचा आणि बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याचा तपास सीआयडी करत आहे. तसेच मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या वसुलीच्या गुन्ह्याची सीआयडीकडून चौकशी सुरु आहे.

मुंबईतील गोरेगाव पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या वसुलीच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट 11 करत होते. याशिवाय परमबीर सिंग यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची एसीबी खुली चौकशी करत होती. हे सर्व गुन्हे आता सीबीआयकडे वर्ग झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांच्यावर दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले होते. आठवडाभराच्या कालावधीत परमबीर सिंह यांच्यावर दाखल असणाऱ्या सर्व गुन्ह्यांची कागदपत्रे महाराष्ट्र पोलिसांनी सीबीआयला सोपवावीत असे निर्देशही न्यायालयाने दिले होते.

Web Title: Suspension of former mumbai cp param bir singh is reversed by shinde fadnavis government a big blow to maha vikas aghadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2023 | 03:43 PM

Topics:  

  • Home Minister
  • Mumbai Police Commissioner
  • Parambir Singh

संबंधित बातम्या

‘भागवतांना नागपुरातून उचलून मुंबईत आणण्याचे आदेश परमबीर सिंहांनी दिले होते’; माजी अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा
1

‘भागवतांना नागपुरातून उचलून मुंबईत आणण्याचे आदेश परमबीर सिंहांनी दिले होते’; माजी अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.