Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tahawwur Rana Case: “दहशतवादी तहव्वूर राणावर काँग्रेस नेत्यांना प्रेम उफाळून आलंय”, संजय निरुपम यांची टीका

Tahawwur Rana Case: संजय निरुपम यांनी आरोप केला की, २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मनमोहन सिंग सरकारने पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली नाही कारण देशातील मुस्लिम संतप्त होतील.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 11, 2025 | 06:48 PM
"दहशतवादी तहव्वूर राणावर काँग्रेस नेत्यांना प्रेम उफाळून आलंय", संजय निरुपम यांची टीका (फोटो सौजन्य-X)

"दहशतवादी तहव्वूर राणावर काँग्रेस नेत्यांना प्रेम उफाळून आलंय", संजय निरुपम यांची टीका (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याला अमेरिकेतून भारतात फरफटत आणण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले. मात्र काँग्रेस नेत्यांना राणाबद्दल प्रेम उफाळून आले अशी टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली. दहशतवाद्यावर राजकारण करण्यापेक्षा काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन करावे, असा टोला निरुपम यांनी लगावला.

तसेच भारताचा शत्रू तहव्वूर राणाबद्दल काँग्रेस नेत्यांना प्रेम उफाळून आले आहे. काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी राणाला भारतात आणण्याचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र चिदंबरम यांची ही कृती निंदनीय आहे, असे निरुपम म्हणाले. ते पुढे म्हणाले की, २००९ मध्ये यूपीए सरकारच्या काळात ११ नोव्हेंबर २०२९ रोजी तहव्वूर राणा आणि डेविड हेडलीविरोधात एनआयएने गुन्हा दाखला केला होता, मात्र २०११ मध्ये अमेरिकेच्या न्यायालयाने या केसमध्ये राणाला सोडून दिले होते. मात्र त्यावर काँग्रेस सरकारने कोणताच विरोध केला नाही. २०१४ मध्ये यूपीए सरकार गेले आणि केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवे सरकार आले आणि राणाच्या प्रत्यार्पणासाठी जोरदार प्रयत्न झाले, असे निरुपम म्हणाले.

एसटी महामंडळाला मिळाले 120 कोटी , एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रश्नांसाठी राजशिष्टाचाराला बगल

निरुपम पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दहशतवाद संपवायचा असेल तर एका आरोपीचे भारताकडे प्रत्यार्पण झाले असे आवाहन केले होते. त्यानंतर एनआयने पुन्ह हा खटला चालवला आणि राणाच्या प्रत्यार्पणाचा पाठपुरावा केला, ही मागणी अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आणि राणाला भारताच्या स्वाधीन केले. हे केंद्र सरकारच्या प्रयत्नांचे श्रेय आहे, असे निरुपम म्हणाले.

मुंबईत २६/११ चा हल्ला झाला त्यात शूर पोलीस शहिद झाले. निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. मात्र त्यावेळी सत्ताधारी काँग्रेसकडून या हल्ल्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात आहे, अशा प्रकारचा अपप्रचार करण्यात आला होता. आज राणाच्या प्रत्यार्पणाचे श्रेय घेण्याचे काम काँग्रेसकडून केले जात आहे. यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या काळात भारतात ९७३९ दहशतवादी हल्ले झाले. यूपीए सरकारच्या काळात दररोज देशभरात हल्ला होत होता, मात्र २०१४ पासून जम्मू काश्मिर वगळल्यास एकही मोठा दहशवादी हल्ला झाला नाही. मोदी सरकारने दहशतवाद्यांच्या मनात जबरदस्त जरब बसवली. देशातली अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्याबरोबर सरकारने दहशतवादीविरोधी धोरणामुळे भारतीय सुरक्षित आहेत, असे निरुपम म्हणाले. दहशतवाद हा देशाच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. काँग्रेसला त्यांच्या काळात जे काम करता आले नाही ते मोदी सरकारच्या काळात झाले. खरतर काँग्रेसवाल्यांनी मोदी सरकारचे अभिनंदन करायला हवे, असे निरुपम म्हणाले.

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहिणींना’ कर्जबाजारी बनवले, मानखुर्दच्या ६५ महिलांच्या नावावर २० लाखांचे कर्ज, नेमकं काय आहे प्रकरण?

Web Title: Tahawwur rana case tahawwur rana nia custody shiv sena leader sanjay nirupam reaction allegations on congress hindu muslim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2025 | 06:48 PM

Topics:  

  • Mumbai
  • Sanjay Nirupam
  • Tahawwur Rana

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार
3

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार

Mumbai High Court: “एखाद्या व्यक्तीची अटक गंभीर…”, मुंबई पोलिसांवर उच्च न्यायालयाचे ताशेरे, भरपाईचे दिले आदेश; नेमकं प्रकरण काय?
4

Mumbai High Court: “एखाद्या व्यक्तीची अटक गंभीर…”, मुंबई पोलिसांवर उच्च न्यायालयाचे ताशेरे, भरपाईचे दिले आदेश; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.