
Taloja MIDC Pollution: तळोजा एमआयडीसी नक्की उद्योगांचे केंद्र की अपघातांचे माहेरघर?
काही वर्षांपूर्वी तळोजातील फोमहोम नावाच्या गादीसाठी वापरल्या जाणाऱ्या फोमच्या कारखान्याला आग लागली होती. त्यावेळी कारखान्यात असलेले २७ कामगार सुखरुप बाहेर आले होते. मात्र या कारखान्याची मोठी वित्तीय हानी झाली होती. या आगीची तीव्रता इतकी भयानक होती की ५ किलोमीटरपर्यंत आगीचे लोळ दिसत होते. तसेच या कंपनीच्या मागच्या बाजूस असलेल्या प्लॉट २२ येथील रिचनेस या कंपनीच्या आवारात देखील आगीचे लोळ पोहचले होते. यात किरकोळ नुकसान झाले होते. तळोजा औद्योगिक वसाहतीत ४०००० हून अधिक कामगारांना रोजगार मिळतोय. यापैकी सुमारे १०० च्या आसपास कारखान्यांमध्ये उत्पादन प्रक्रियेसाठी विषारी आणि ज्वालाग्रही केमिकल्स हाताळली जातात.
पनवेल महानगरपालिकेने पालिका कार्यक्षेत्रात ४ फॉग कॅनन वाहने कार्यरत केली असून, काही दिवसात अजून ४ फॉग कॅनन कार्यरत होणार आहेत. सध्या या वाहनांद्वारे चारही प्रभागामध्ये दररोज धूळ प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने सुक्ष्मरित्या पाण्याची फवारणी करण्यात येत आहे. याबरोबरच हवेतील प्रदूषणाची गुणवत्ता निरीक्षण करण्यासाठी मोबाईल एअर क्वालिटी मॉनिटरींग व्हॅन कार्यरत आहे. या गाडीच्यामार्फत पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये दैनंदिन हवा प्रदूषण गुणवत्ता पातळी तपासली जात आहे.
हेही वाचा: Raigad News: कर्जत-खालापूरात राजकीय उलथापालथ! परिवर्तन आघाडीने मारली बाजी, अजित पवार–ठाकरे गट एकत्र
बहुतांश कंपन्यामध्ये बॉयलर्स आणि रिअॅक्टसशिवाय उत्पादनच होऊ शकत नाही, त्यामुळे ते अत्तिधोकादायक निकषात मोडतात. तर तुलनेने कमी घातक रसायने हाताळणारे, मात्र धोकादायक ठरतील असे कारखाने आहेत. सुरक्षा यंत्रणा सदैव हाय अलर्ट कर असायला हवी. परंतु ती तशी आहे का? हा महत्वाचा मुद्दा आहे. पर्यावरणाकडेही सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे. कंपन्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेत आणि प्रदूषण नियंत्रणाकडे दुर्लक्ष करत असतील तर, त्यांना वठणीवर आणण्याची जबाबदारी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. त्यासाठी फॅक्टरी इन्स्पेक्टर्स आणि प्रदूषण नियंत्रण अधिकारीसुध्दा तैनात आहेत. प्रदूषणावर नियंत्रण ठेवता येत नसल्याचा ठपका ठेवत हरित विभागाने लाखो रुपयाचा दंड ठोठवला आहे.