Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई-गोवा हायवेवर ३ टोलनाके! प्रवाशांच्या खिशावर आता तिहेरी भार; वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला अजूनही पूर्णविराम मिळालेला नसताना आता प्रवाशांवर तीन टोलचा भार टाकण्याची तयारी सुरू झाल्याने कोकणवासीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 09, 2026 | 05:08 PM
मुंबई-गोवा हायवेवर ३ टोलनाके! प्रवाशांच्या खिशावर आता तिहेरी भार; वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी (फोटो-सोशल मीडिया)

मुंबई-गोवा हायवेवर ३ टोलनाके! प्रवाशांच्या खिशावर आता तिहेरी भार; वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Mumbai-Goa Highway Toll: मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला अजूनही पूर्णविराम मिळालेला नसताना आता प्रवाशांवर तीन टोलचा भार टाकण्याची तयारी सुरू झाल्याने कोकणवासीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अपूर्ण रस्ता, निकृष्ट दर्जाचे गावाकडचे मार्ग आणि अपुऱ्या सुविधा यामुळे आधीच त्रस्त असलेल्या प्रवाशांना आता तीनदा टोल भरावा लागणार असल्याची माहिती समोर आल्याने संतापाची लाट उसळली आहे. महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर या सुमारे ९० किमीच्या अंतरात खारपाडा आणि खांब या दोन ठिकाणी टोल नाके उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना एका प्रवासात दोन ठिकाणी टोल भरावा लागणार आहे.

पुढील टप्प्यात पोलादपूर जवळ लोहारे येथेही टोल वसुली सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या ठिकाणी टोल नाका उभारण्यात आले असून सिग्नल यंत्रणा सुरू झाली आहे. या घडामोडींमुळे “रस्ता पूर्ण नसताना टोल कशासाठी?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. महामार्गाचे काम पूर्ण झालेले नसताना टोल वसुली सुरू करण्याची घाई का ? रस्त्यावर अजूनही खड्डे, अपूर्ण पूल, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या सुविधा असताना प्रवाशांकडून टोल आकारणे योग्य आहे. का? असे अनेक प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत. हा महामार्ग बनविण्यासाठी जेवढी वर्षे लागतील तेवढी वर्षे टोल आकारणी करु नये. या महामार्गावर अपघातांमध्ये हजारो निष्पाप आणि निरपराध लोकांचे हकनाक बळी गेले आहेत. टोल आकारण्याची घाई करू नये. याबाबत सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण आणि रुंदीकरणाचे काम २०११ साली सुरू झाले. मात्र निधीअभावी, पर्यावरणीय परवानग्या, भूसंपादनातील अडचणी आणि ठेकेदारांच्या निष्क्रयतेमुळे हे काम वर्षानुवर्षे रखडत गेले. तब्बल १६ वर्षांहून अधिक काळानंतरही महामार्गाचे अनेक भाग अपूर्ण असून काही ठिकाणी अजूनही काम सुरूच आहे. टोलचे दर किती असतील? याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र येत्या काही दिवसांत याबाबत अधिसूचना प्रसिद्ध होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. टोल सुरू झाल्यानंतर वाहनधारकांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणातील लाखो लोकांसाठी जीवनरेखा मानला जातो. पर्यटन, व्यापार आणि दैनंदिन प्रवासासाठी या मार्गाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे रस्ता पूर्ण, सुरक्षित आणि दर्जेदार झाल्यानंतरच टोल आकारावा व सुलभशौचालय, स्ट्रीट लाईट, चार्जिंग, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध कराव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अपूर्ण रस्त्यावर टोल वसुलीचा निर्णय घेतल्यास तो कोकणवासीयांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरेल, अशी भावना सध्या सर्वत्र व्यक्त होत आहे.

Web Title: 3 toll booths on mumbai goa highway now triple burden on commuters pockets strong displeasure among drivers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 05:08 PM

Topics:  

  • Mumbai-Goa highway
  • raigad
  • Toll Plaza

संबंधित बातम्या

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
1

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
2

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

Aditi Tatkare : हरिहरेश्वरच्या पर्यटनासाठी आदिती तटकरेंचा पुढाकार, पर्यटन सुविधांना चालना देण्याच्या सूचना
3

Aditi Tatkare : हरिहरेश्वरच्या पर्यटनासाठी आदिती तटकरेंचा पुढाकार, पर्यटन सुविधांना चालना देण्याच्या सूचना

Raigad News: अजेंडा, कर्जमाफी अन् ई-पीक पाहणीवरून शेतकरी आक्रमक;  दुष्काळाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन
4

Raigad News: अजेंडा, कर्जमाफी अन् ई-पीक पाहणीवरून शेतकरी आक्रमक; दुष्काळाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.