Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: निर्यात माल अडकू नये म्हणून JNPA ची विशेष टीम; बंदरातील स्थितीत सुधारणा, कंटेनरची संख्या 5000 वरून 3200

व्यापाऱ्यांशी आणि निर्यातदारांशी सातत्याने संवाद साधण्यासाठी जेएनपीएचे मुख्य महाव्यवस्थापक (वाहतूक) गिरीश थोमस यांची प्रमुख संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 10, 2026 | 03:36 PM
Raigad News: निर्यात माल अडकू नये म्हणून JNPA ची विशेष टीम; बंदरातील स्थितीत सुधारणा, कंटेनरची संख्या 5000 वरून 3200

Raigad News: निर्यात माल अडकू नये म्हणून JNPA ची विशेष टीम; बंदरातील स्थितीत सुधारणा, कंटेनरची संख्या 5000 वरून 3200

Follow Us
Follow Us:
  • व्यापार सुरळीत ठेवण्यासाठी JNPAचे मोठे पाऊल; काही शुल्क आणि दंडही तात्पुरते माफ
  • कृषी निर्यातीला दिलासा! केळी-द्राक्षांच्या कंटेनरला JNPAकडून प्राधान्य
  • बंदरातील अडचणी कमी करण्यासाठी JNPAची रणनीती; निर्यातदारांना मिळाला दिलासा
उरण: मध्यपूर्वेतील बदललेल्या राजकीय परिस्थितीचा परिणाम भारताच्या आयात-निर्यात व्यापारावर होऊ नये यासाठी जेएनपीएने भागधारकांसोबत समन्वय साधत उपाययोजना सुरू केल्या. त्यामुळे बंदरातील अडकलेल्या कंटेनरची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली असून १ मार्चला ५,००० टीईयू असलेली संख्या ८ मार्चपर्यंत ३,२०० टीईयूवर आली.

Fort Trails, Unveiling the Hidden History: पोर्तुगीजांच्या वास्तुकलेने नटलेला, मराठ्यांच्या इतिहासाने रंगलेला ‘अशेरी किल्ला’

मध्यपूर्वेतील परिस्थितीमुळे जहाजांच्या वेळापत्रकात बदल झाल्याने निर्यात मालाच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. या पार्श्वभूमीवर व्यापारातील अडचणी दूर करण्यासाठी जेएनपीए प्रशासनाने विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेले विशेष समन्वय पथक स्थापन केले आहे. या पथकात परकीय व्यापार महासंचालनालय, सीमाशुल्क विभाग तसेच जेएनपीएचे वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत. व्यापाऱ्यांशी आणि निर्यातदारांशी सातत्याने संवाद साधण्यासाठी जेएनपीएचे मुख्य महाव्यवस्थापक (वाहतूक) गिरीश थोमस यांची प्रमुख संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  (फोटो सौजन्य – AI Created)

लॉजिस्टिकमध्ये सुधारणा

रीफर ट्रान्सपोर्टर्स असोसिएशनसोबत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर रेफर तसेच इतर कंटेनर वाहतुकीसाठी पुरेसे ट्रेलर्स उपलब्ध राहतील याची खात्री जेएनपीएतर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे बंदरातून कंटेनर बाहेर पडण्याची प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना सुरू आहे. विशेषतः केळी, द्राक्षे यांसारख्या लवकर नाश पावणाऱ्या कृषी मालाच्या कंटेनरची वेळेत व सुरक्षित हाताळणी करण्यावर भर दिला जात आहे.

समन्वित प्रयत्नांना यश

या समन्वित प्रयत्नांमुळे बंदरातील परिस्थितीत सातत्याने सुधारणा होत आहे. अडकलेल्या नाशवंत कंटेनरची संख्या सुमारे २,००० वरून जवळपास १,००० पर्यंत कमी झाली आहे.

बदलत्या परिस्थितीवर जेएनपीए बारकाईने लक्ष ठेवून आहे. आयातीर निर्यात क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी शिपिंग मंत्रालय, सीमाशुल्क विभाग, टर्मिनल ऑपरेटर्स आणि व्यापारी संघटनांसोबत सातत्याने समन्वय साधला जात आहे. – गोविंद दयाल, अध्यक्ष, जेएनपीए

BMC मध्ये पारदर्शकतेचे नवे पर्व! मुंबईसाठी भाजपचा १०० दिवसांचा ‘२० सूत्रीय’ कार्यक्रम; मुख्यमंत्र्यांचे भ्रष्टाचारमुक्तीचे आदेश

निर्यातदारांना दिलासा देण्यासाठी विविध उपाय

  • व्यापार सुरळीत ठेवण्यासाठी जेएनपीएकडून काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
  • मध्यपूर्वेकडे जाणाऱ्या मालासाठी तात्पुरत्या ट्रान्सशिपमेंट साठवणुकीची सोय
  • अतिरिक्त साठवणूक क्षेत्र उपलब्ध करून देणे
  • नाशवंत व परत येणाऱ्या निर्यात मालाला प्राधान्याने हाताळणी
  • निर्यात कंटेनरच्या ‘बैंक टू टर्मिनल’ (बीटीटी) हालचालींना गती

काही शुल्क व दंडही तात्पुरते माफ

सीमाशुल्क विभागानेही निर्यात मालाच्या हालचाली सुलभ करण्यासाठी काही महत्त्वाच्या सवलती जाहीर केल्या आहेत. एक्सपोर्ट जनरल मॅनिफेस्ट (EGM) दाखल झालेल्या कंटेनरना बीटीटी मार्गे हालचालीची परवानगी देण्यात येत आहे. कंटेनरवरील सील सुरक्षित असल्यास प्राथमिक तपासणीतून ही प्रक्रिया जलद केली जात आहे. तसेच या प्रक्रियेसाठी लागणारी काही शुल्के व दंडही तात्पुरते माफ करण्यात आले आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Jnpa forms special task force to handle export disruptions linked to middle east situation raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

फक्त ₹१०० पासून सुरू करा गुंतवणूक, जेव्हा हवं तेव्हा पैसे काढा! Swiggy वर थेट मिळणार Zerodha म्युच्युअल फंडचा पर्याय
1

फक्त ₹१०० पासून सुरू करा गुंतवणूक, जेव्हा हवं तेव्हा पैसे काढा! Swiggy वर थेट मिळणार Zerodha म्युच्युअल फंडचा पर्याय

सगळ्यांसाठी नियम सारखाच…’या’ अंतर्गत नियमामुळे Noel Tata नोव्हेंबरमध्ये सोडणार पद, काय आहे Tata Sons ची Policy?
2

सगळ्यांसाठी नियम सारखाच…’या’ अंतर्गत नियमामुळे Noel Tata नोव्हेंबरमध्ये सोडणार पद, काय आहे Tata Sons ची Policy?

Gautam Adani यांची सर्वात मोठी घोषणा! भारतात उभारणार 10 GW चा न्यूक्लियर पॉवर प्लँट; ऊर्जा क्षेत्रात खळबळ
3

Gautam Adani यांची सर्वात मोठी घोषणा! भारतात उभारणार 10 GW चा न्यूक्लियर पॉवर प्लँट; ऊर्जा क्षेत्रात खळबळ

Tomato Price Hike: टोमॅटोचे भाव 70 रुपयांच्या पार, भाव कमी करण्यासाठी सरकारने घेतला मोठा निर्णय?
4

Tomato Price Hike: टोमॅटोचे भाव 70 रुपयांच्या पार, भाव कमी करण्यासाठी सरकारने घेतला मोठा निर्णय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.