Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tapovan School Food Controversy: मेथीची भाजी डब्यात आणल्याने विद्यार्थ्याला दंड; मीरा भाईंदरमधील तपोवन शाळेला पालिकेची नोटीस

संबंधित विद्यार्थ्याच्या डब्यातील मेथीच्या भाजीवर आक्षेप धेत्यानंतर त्याला कॅन्टीनमधून दुसरा खाद्यपदार्थही देण्यात आला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर मनसेने याबाबत महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत शिक्षण विभागाने तपोवन विद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 22, 2026 | 12:12 PM
Tapovan School, Methi Vegetable Controversy

Tapovan School, Methi Vegetable Controversy

Follow Us
Follow Us:
  • सेव्हन स्क्वेअर शाळेनंतर मीरा भाईंदरमधील तपोवन विद्यालयात आहारावरून नवा वाद
  • पर्यूषण काळात डब्यात मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला ५० रुपयांचा दंड ठोठावला
  • मांसाहारासह कांदा, लसूण, बीट आणण्यावर शाळा प्रशासनाकडून निर्बंध
Paryushan Food Restriction In School: भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन स्क्वेअर शाळेने पर्यूषण काळात विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, लसूण यांसह काही खाद्यपदार्थ आणण्यास बंदी घातल्याचे प्रकरणाचा वाद अद्याप शमलेला नाही. असे असतानाच आता मीरा भाईंदर येथील तपोवन विद्यालयातून असाच प्रकार उघडकीस आला आहे. पर्यषून काळात डब्यात मेथीची भाजी आणल्याने एका विद्यार्थ्याकडून शाळेने ५० रुपयांचा दंड आकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तक्रार केल्यानंतर मिरा भाईंदर महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तपोवन विद्यालयाने पर्यूषण काळात विद्यार्थ्यांना डब्यात मांसाहारी पदार्थांसह कांदा, लसूण, बीट आदी खाद्यपदार्थ आणण्यास बंदी घातली होती. खास बाब म्हणजे यासंदर्भात शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांवर काही नियमही लादण्यात आले होते. पण एका विद्यार्थ्यांने शाळेत मेथीची बाजू नेल्याचे निदर्शनास आल्याने शाळेने संबंधित विद्यार्थ्याकडून ५० रुपये दंड आकारल्याचे समोर आले.

Maharashtra MLC Election 2026: मोठी बातमी! राज्यातील ५ शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर, वाचा

धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित विद्यार्थ्याच्या डब्यातील मेथीच्या भाजीवर आक्षेप धेत्यानंतर त्याला कॅन्टीनमधून दुसरा खाद्यपदार्थही देण्यात आला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर मनसेने याबाबत महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत शिक्षण विभागाने तपोवन विद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली.

विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारे दंड आकारण्याचा निर्णय कोणत्या नियमांच्या आधारे घेण्यात आला, पर्यूषण काळात खाद्यपदार्थांवरील निर्बंध लादण्यासाठी कोणते निर्देश देण्यात आले होते, याबाबत महापालिका प्रशासनाने स्पष्टीकरण मागवले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, कायद्यानुसार, शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आहारासंदर्भात धार्मिक किंवा सांस्कृतिक नियम लागू करता येऊ शकत नाही. असे असतानाही शाळेने हे निर्बंध का लादले, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यामुळे या प्रकरणात शाळेकडून काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे आता पालकांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वीही ५० रुपयांच्या दंडाची तक्रार

तपोवन विद्यालयातील डब्याचा हा वाद नवीन नसून, पर्युषण पर्वाच्या काळात विद्यार्थ्यांच्या खाद्यपदार्थांबाबत करण्यात आलेल्या कथित नियमांमुळे यापूर्वीही वाद निर्माण झाला होता. पालकांच्या तक्रारीनुसार, विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, बटाटा, अद्रक, बीट आणि गाजर यांसारख्या भाज्या आढळल्यास ५० रुपये दंड आकारण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या तक्रारीनंतर मीरा-भाईंदर महापालिकेच्या शिक्षण विभागाने १७ सप्टेंबर रोजी तपोवन विद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या डब्याबाबतचे नियम, त्यांची अंमलबजावणी आणि कथित दंड आकारण्याबाबत शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.

मेथीवरील २० रुपये दंड की कॅन्टीनचे शुल्क?

नव्या प्रकरणात मात्र एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्याच्या मेथीच्या भाजीवर आकारण्यात आलेले २० रुपये हे दंड म्हणून आकारण्यात आले होते की विद्यार्थ्याला कॅन्टीनमधून देण्यात आलेल्या खाद्यपदार्थाचे शुल्क होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विद्यार्थ्याच्या वहीत ‘बंदी असलेली मेथीची भाजी’ असा शेरा का मारण्यात आला, घरून आणलेला डबा विद्यार्थ्याला का देण्यात आला नाही आणि त्याऐवजी कॅन्टीनमधून खाद्यपदार्थ देण्याचा निर्णय कोणत्या नियमाच्या आधारे घेण्यात आला, याची स्पष्टता होणे आवश्यक आहे.

पिंपरी-चिंचवडला मुसळधार पावसाने झोडपले; उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा

शाळेच्या खुलाशाकडे लक्ष

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर तपोवन विद्यालयाचा अधिकृत खुलासा अद्याप समोर आलेला नाही. शाळेची भूमिका जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे मेथीची भाजी शाळेच्या नियमांनुसार प्रतिबंधित होती का, विद्यार्थ्याच्या वहीत तसा शेरा का मारण्यात आला, २० रुपये नेमके कोणत्या कारणासाठी आकारण्यात आले आणि विद्यार्थ्याला घरचा डबा न देता कॅन्टीनमधून खाद्यपदार्थ का देण्यात आला, याची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत.

महापालिका शिक्षण विभागाने यापूर्वीच शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावल्याच्या पार्श्वभूमीवर आता मेथीच्या भाजीसंदर्भातील नव्या दाव्याचीही दखल घेतली जाते का, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Tapovan school fined student for bringing fenugreek vegetable during paryushan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • Educational News
  • Meera Bhayander News
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: ध्वनिप्रदूषणावर मुंबई हायकोर्टाची सुमोटो दखल! उत्सवांचा अधिकार आहे; पण नागरिकांच्या हक्कांवर गदा नको
1

Mumbai News: ध्वनिप्रदूषणावर मुंबई हायकोर्टाची सुमोटो दखल! उत्सवांचा अधिकार आहे; पण नागरिकांच्या हक्कांवर गदा नको

‘संपूर्ण महाराष्ट्रात एक हजार रोजगार मेळावे…’; Mangal Prabhat Lodha यांचे तरुणांना आवाहन
2

‘संपूर्ण महाराष्ट्रात एक हजार रोजगार मेळावे…’; Mangal Prabhat Lodha यांचे तरुणांना आवाहन

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ; नामांकित डॉक्टरांसोबत घडला धक्कादायक प्रकार
3

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ; नामांकित डॉक्टरांसोबत घडला धक्कादायक प्रकार

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल
4

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.