Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुनी वाहनं वापरणं आता महाग होणार; वाहनांवर दुपटीने केली गेली करवाढ

राज्याला दरवर्षी सुमारे १६० कोटींपेक्षा अधिक अतिरिक्त महसूल मिळणार असून, हा निधी रस्ता सुरक्षा, आधुनिक परिवहन सुविधा, एटीएस प्रणाली आणि प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 19, 2026 | 02:27 PM
जुनी वाहनं वापरणं आता महाग होणार; वाहनांवर दुपटीने केली गेली करवाढ

जुनी वाहनं वापरणं आता महाग होणार; वाहनांवर दुपटीने केली गेली करवाढ

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे महाराष्ट्र मोटार वाहन कर सुधारणा विधेयक, २०२६ बुधवारी (दि.१८) विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकाद्वारे वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी जुन्या आणि प्रदूषणकारी वाहनांवरील पर्यावरण करात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

या सुधारित कर रचनेमुळे राज्याला दरवर्षी सुमारे १६० कोटींपेक्षा अधिक अतिरिक्त महसूल मिळणार असून, हा निधी रस्ता सुरक्षा, आधुनिक परिवहन सुविधा, एटीएस प्रणाली आणि प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणार आहे. तसेच, औद्योगिक क्षेत्राला दिलासा देत क्रेन वाहनांवरील मोटार वाहन करासाठी ३० लाख रुपयांची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामुळे बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. विधेयकामुळे राज्याच्या एकत्रित निधीवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नसून उलट महसूल वाढीस मदत होणार आहे.

पर्यावरण कर पाच वर्षांसाठी आकारणार

सुधारित विधेयकानुसार, दुचाकी वाहनांसाठी पर्यावरण कर २००० रुपये वरून ४००० रुपये, पेट्रोल वाहनांसाठी ३००० रुपये वरून ६००० रुपये, तर डिझेल वाहनांसाठी ३५०० रुपये वरून ७००० रुपये करण्यात आला आहे. हा कर दर पाच वर्षांसाठी एकरकमी आकारला जाणार आहे.

पर्यावरणीय धोरणाला बळकटी मिळणार

विधेयकामुळे नागरिकांना बीएस-६ आणि इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करण्यास प्रोत्साहन मिळणार असून, राज्याच्या पर्यावरणीय धोरणाला बळकटी मिळणार आहे. याशिवाय ग्रामीण आणि आदिवासी भागात दरवर्षी जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होण्याची शक्यता मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. या विधेयकामुळे राज्याच्या एकत्रित निधीवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नसून, उलट महसूल वाढीस मदत होणार आहे.

हेदेखील वाचा : “इलेक्ट्रिक बस बैठक फुसका बार, मंत्र्यांच्या निर्देशाचे अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही”, एसटी कर्मचारी काँग्रेसची टीका

Web Title: Taxes on old vehicles have been doubled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • Government Decision
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

दस्तांच्या प्रमाणित प्रती ‘ई-प्रमाण’वर; अकोला जिल्ह्यातील 9 कार्यालयांमार्फत विविध सेवा उपलब्ध
1

दस्तांच्या प्रमाणित प्रती ‘ई-प्रमाण’वर; अकोला जिल्ह्यातील 9 कार्यालयांमार्फत विविध सेवा उपलब्ध

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
2

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

राज्यात 30.82 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त; सणासुदीत भेसळखोरांवर FDA ची असणार नजर
3

राज्यात 30.82 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त; सणासुदीत भेसळखोरांवर FDA ची असणार नजर

मोठी बातमी ! रस्त्यांवर फटाके फोडण्यास आता बंदी; डीजे, लेझर बीमलाही विरोध
4

मोठी बातमी ! रस्त्यांवर फटाके फोडण्यास आता बंदी; डीजे, लेझर बीमलाही विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.