
Teacher Eligibility Test TET centers inspected 5062 candidates present Nanded News
नियोजित वेळापत्रकानुसार पेपर-१ सकाळी १०.३० ते १.०० मध्ये २४४२ पैकी २३३९ उपस्थित तर १०३ गैरहजर राहिले आणि पेपर-२ दुपारी २.३० ते ५.०० या वेळेत २८६६ पैकी २७२३ परीक्षार्थी उमेदवारांनी उपस्थिती दर्शविली आणि १४३ गैरहजर राहिले. जिल्हा परीषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड,शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांनी यावेळी परीक्षा केंद्रांवर भेटी देत आढावा घेतला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांनी केंद्रप्रमुखांना आवश्यक सूचना दिल्या तसेच सर्व व्यवस्था प्रत्यक्ष पाहून समाधान व्यक्त केले.
परीक्षा सुरळीत
परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधिन संनियंत्रण अधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल शिक्षणाधिकारी (प्रा.), जिल्हा परिषद हिंगोल यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना देण्यान आल्या आहेत. परीक्षेचे संपूर्ण सत्र शिस्तबद्ध सुरळीत रीतीने पार पडल्याची माहित प्रशासनाकडून देण्यात आली. ही परीक्ष शहरातील पोद्दार इंटरनॅशनल इंग्लिश, स्कूट जवळा पळशी रोड हिंगाली, अनसुया विद्यामंदि खटकाळी परिसर हिंगोली भाग-१, आद महाविद्यालय, हिंगोली इमारत भाग-शांताबाई मुंजाजी दराडे हायस्कूल, हिंगोल सरजुदेवी भि.भा. आर्य कन्या विद्यालय हिंगोली, विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल हिंगोली सेक्रेट हार्ट इंग्लिश स्कूल हिंगोली, शिवा महाविद्यालय कोथळज रोड, माउंट लिटेरा इं स्कूल नरसी फाटा हिंगोली आणि अनसूय विद्यामंदिर खटकाळी येथे घेण्यात आली.
महायुतीमध्ये का सुरु आहे नाराजीनाट्य? मुंबईचा महापौर कोणाचा? DCM एकनाथ शिंदेंनी स्पष्टच दिलं उत्तर
शासकीय कामात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल
लोहा. तालुक्यातील खांबेगाव येथे गावातील महत्त्वपूर्ण शासकीय कामात व्यस्त असताना रिसनगाव येथील एका कार्यकर्त्याने गोंधळ घालत कामत व्यत्यय आणून शिवीगाळ केली असल्याची तक्रार प्रकरणी लोहा पोलिसात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. खांबेगाव ता. लोहा येथील ग्रामविकास अधिकारी महिला लता व्यंकटराव सत्वधर या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर कार्यालयीन कामकाजात व्यस्त असताना आरोपी बालाजी अर्जुन शिंदे रा. रिसनगाव ता.. लोहा याने ग्रामविकास अधिकारी यांच्यासोबत चौकशी अधिकारी है शासकीय काम करीत असताना त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला प्रकरणी फिर्यादी लता व्यंकटराव सत्वधर यांच्या तक्रारीवरून लोहा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास सपोउपनि क्षीरसागर करीत आहेत.