
वडगाव मावळ : इर्शाळवाडीत येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख सक्रिय झाले असून त्यांनी आज मावळ तालुक्यातील दरड प्रवण भागाची पहाणी केली. तसेच येथील नागरीकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत व्हावे,असे आवाहन केले.
त्याठिकाणी निवासी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
मावळ तालुक्यातील बोरज,लोहगड मालेवाडी,तुंग भुशी,माऊ,मोरमारवाडी गबालवाडी या आठ गावांमध्ये दरडी धोकादायक ठिकाणची तहसीलदार विक्रम देशमुख यांनी पाहणी केली यावेळी बांधकाम खात्याचे उपअभियंता धनराज पाटील,शाखा अभियंता श्रीनिवास पाटील आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते.
मावळ तालुक्यातील दरड प्रवण भागातील नागरिकांनी सुचना देण्यात आल्या आहेत परिस्थिती नुसार काही कुटूंबाची शाळांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.धोकादायक ठिकाणी शासकीय कंट्रोल रूम करण्यात आले आहे. आपत्ती घडल्यास तात्काळ सरपंच पोलिस पाटील, तलाठी सर्कल यांनी त्वरित कंट्रोल रूमला कळवावे अशा सूचना मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिल्या आहेत.
आपात्कालीन हेल्पलाइन नंबर सुरू
मावळ तालुक्यात नागरिकांनासाठी ७३८७५१८२३२ हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला आहे. मदतीसाठी आवश्यक वाटल्यास या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार देशमुख यांनी केले आहे.
[blockquote content=”मावळ तालुक्यात सध्या परिस्थितीत कोठेही भूस्खलना् दरड कोसळण्याची शक्यता दिसत नाही.तरी नागरीकानी धोकादायक ठिकाणी जाऊ नये. ग्रामसेवकांना संबंधित गावात राहण्याच्या सूचना देण्यात आले आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. ” pic=”” name=”- विक्रम देशमुख, तहसीलदार मावळ”]