Death
सटाणा : वॅगनआर कारचे टायर फुटून समोरून येणाऱ्या दुचाकीवर आदळून एक अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार पंकज भिला बोरसे (वय ४३) गंभीर झाले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात नागपूर-मालेगाव रस्त्यावरील वडनेरनजीक झाला.
ब्राम्हणपाडे येथील तरुण शेतकरी पंकज भिला बोरसे (वय ४३) व अविनाश दत्तात्रय बोरसे (वय ३५) हे दोघे काका पुतणे दुचाकीने मालेगावहून आपले काम आटोपून सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास गावाकडे निघाले होते. वडनेर ते कोठरे फाआदळून झाटा दरम्यान पवार मळ्यानजीक समोरून येणाऱ्या वॅगनआर कारचे टायर फुटले. कार दुचाकीवर आदळल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये पंकज बोरसे यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने ते गंभीर जखमी झाले. तर त्यांचा पुतण्या अविनाश याचा एक हात व पाय मोडला. त्यांना उपचारासाठी मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पंकज बोरसे यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर ब्राम्हणपाडे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.