फोटो सौजन्य - सोशल मिडीया
गोंदिया जिल्ह्यात ट्राफिक पोलिसांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. एका भरधाव ट्रकने ट्राफिक पोलिसांच्या गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाल्याची माहिती आहे. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील मसुलकसा घाटात हा अपघात झाला. या अपघातात एका पोलिसाचा मृत्यू झाला असून इतर २ पोलीस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एका जखमीची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील कोहमारा येथील राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या गाडीला भीषण अपघात झाला. एका भरधाव ट्रकने पोलिसांच्या गाडीला पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. या ट्रकमधील लोखंडी अँगल पोलिसांच्या व्हॅनवर कोसळले. या अपघातात एका पोलिसाचा मृत्यू झाला असून २ पोलीस जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मनीष बहेलीया मृत्यू झालेल्या पोलिसाचं नाव आहे. सहायक पोलिस निरीक्षक दिनेश लिल्हारे आणि पोलिसांच्या व्हॅनचे चालक योगेश बनोटे हे दोघे जखमी झाले आहेत. या भीषण अपघातात पोलिसांच्या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
अपघातामुळे मार्गावर काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती. तसेत स्थानिक देखील अपघातस्थळी दाखल झाले होते. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिकांच्या मदतीनं जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी अपघाग्रस्त गाडी मार्गावरून बाजूला केली. त्यामुळे वाहतूक पुन्हा सुरळित झाली. या अपघातात सहायक पोलिस निरीक्षक दिनेश लिल्हारे जखमी झाले आहेत. तर पोलिसांच्या व्हॅनचे चालक योगेश बनोटे यांना किरकोळ जखम झाली आगे. याप्रकरणी गोंदिया पोलीस पुढील तपास करत आहेत.
गडचिराेलीमध्ये एका ११ वर्षीय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ऋतुराज प्रशांत शिवणकर (११) असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. काल सांयकाळी शाळेतून घरी येताना ऋतुराजला एका भरधाव ट्रकने धडक दिली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. गडचिराेलीमधील वसा येथे हा अपघात झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सायंकाळी शाळा सुटल्यावर ऋतुराज त्यांच्या मित्रांसोबत सायकल चालवत गावाकडे निघाला. पाेर्लापासून अवघ्या एका किमी अंतरावर गडचिराेली-आरमाेरी राष्ट्रीय महामार्गावर त्याच गाव आहे. गावाच्या रस्त्यानं सायकल वळवताच त्याला भरधाव ट्रकने धडक दिली आणि त्याचा मृत्यू झाला.