Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तालिबानींच्या हिट लिस्टवर आता मुंबई ? NIA ला ईमेलद्वारे मुंबईवर हल्ला करण्याची धमकी,देशभरात अलर्ट

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) ईमेल आयडीवर आलेल्या मेलमध्ये मुंबईवर हल्ला करण्याची धमकी (Terror Threat In Mumbai) दिली आहे. ईमेल करणाऱ्याने तालिबानी असल्याचा दावा केला आहे.

  • By साधना
Updated On: Feb 03, 2023 | 11:58 AM
mumbai police

mumbai police

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) मुंबईवर हल्ला (Mumbai Attack) करण्याची धमकी ई-मेलवरून (Email) देण्यात आली आहे. तालिबानचं (Taliban) नाव घेत ही धमकी देण्यात आली आहे. मुंबईसह इतर शहरांवरही हल्ला करणार असल्याचंही या मेलमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. एनआयएनं मुंबई पोलिसांना याविषयीची माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळं इतर यंत्रणांसह मुंबई पोलिसांनीही वेगाने तपासाची चक्रे फिरवली आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ईमेल आयडीवर आलेल्या मेलमध्ये मुंबईवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. ईमेल करणाऱ्याने तालिबानी असल्याचा दावा केला आहे. तालिबानचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानीच्या आदेशानंतर मेल करण्यात आल्याचा दावा मेल करणाऱ्या व्यक्तीने केला आहे. या धमकीच्या मेलविषयी मुंबई पोलिसांना कळवण्यात आले आहे. पोलीस आणि इतर तपास यंत्रणा मेल पाठवणाऱ्याचा तपास करत आहे. मुंबईसह देशातील इतर शहरांमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे.

[read_also content=”सामान्य नागरिक सोडा पाकिस्तानातील ‘या’ भागात तर लष्करही राहतं दहशतीत! 15 वर्षांपासून ‘या’ संघटनेनं आणले नाकी नऊ https://www.navarashtra.com/world/pakistani-military-feel-helpless-in-khyber-pakhtunkhwa-as-there-is-ttp-is-so-powerful-nrps-366907.html”]

सिराजुद्दीन हक्कानी तालिबानच्या सर्वात धोकादायक गट हक्कानी नेटवर्कचा प्रमुख आहे. अफगाणिस्तानात तालिबानच्या सत्तेनंतर सिराजुद्दीन हक्कानी गृहमंत्री झाला. हक्कानी तालिबानचा दुसऱ्या क्रमांकाचा प्रमुख नेता आहे. तालिबाननमध्ये हक्कानीचे नेटवर्क चांगलं आहे. अमेरिकेची एजन्सी एफबीआयने हक्कानीविषयी माहिती देणाऱ्याला 10 मिलिअन डॉलरचे बक्षीस ठेवले आहे.

जानेवारी महिन्यातही मुंबईवर हल्ला करण्याची धमकी
याआधी जानेवारी महिन्यातही मुंबईवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन करत शहराच्या विविध भागात बॉम्बस्फोट करणार असल्याचे सांगितले होते. मुंबईमध्ये झालेल्या 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटाप्रमाणे हे स्फोट असतील,अशी माहिती देण्यात आली आहे. दोन महिन्यात बॉम्बस्फोट करण्यात येणार असल्याचे आधी फोनवर सांगण्यात आले होते. त्यानंतर आता ईमेलवर धमकी देण्यात आली आहे.

पोलीस सुरक्षेत वाढ
मुंबई कायमच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असते. गेल्या सात वर्षात आपल्या सुरक्षा यंत्रणांनी मुंबईसारख्या शहरांचं दहशतवादी हल्ल्यांपासून संरक्षण केलं आहे. धमकीनंतर मुंबईतील प्रमुख धार्मिक स्थळे, पंचतारांकित हॉटेल, महत्त्वची सरकारी आणि बिगर सरकारी स्थळांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. ताजमहाल पॅलेस हॉटेल, ताज लॅण्ड्स एंड हॉटेल, सिद्धिविनायक मंदिर, बाबुलनाथ मंदिर, मुंबादेवी मंदिर, हाजीअली दर्गा, मुंबई स्टॉक एक्स्चेंज, मंत्रालय, मुंबईसह उच्च न्यायालय आणि इतर महत्वाच्या ठिकाणीही पोलीस सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Web Title: Terror threat to mumbai nia received email high alert in country nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2023 | 11:55 AM

Topics:  

  • Mumbai
  • Mumbai Attack
  • Mumbai News

संबंधित बातम्या

“रस्त्यावर नमाज पडणे हा शौक नाही, तर…”, नमाजच्या निर्णयावर अबू आझमींचा भाजपवर घणाघाती हल्ला
1

“रस्त्यावर नमाज पडणे हा शौक नाही, तर…”, नमाजच्या निर्णयावर अबू आझमींचा भाजपवर घणाघाती हल्ला

Maharashtra 1st Conclave: जागतिक गुंतवणूक आणि विकासावर मंथन; 19 मे रोजी मुंबईत दिग्गजांचा महासंगम
2

Maharashtra 1st Conclave: जागतिक गुंतवणूक आणि विकासावर मंथन; 19 मे रोजी मुंबईत दिग्गजांचा महासंगम

Mumbai Crime: मुंबई हादरली! भावानेच दिली मोठ्या भावाच्या हत्येची सुपारी, चार आरोपींना अटक; कारण काय?
3

Mumbai Crime: मुंबई हादरली! भावानेच दिली मोठ्या भावाच्या हत्येची सुपारी, चार आरोपींना अटक; कारण काय?

मुंबईची तहान भागणार! समुद्राचे पाणी गोड होणार; मनोरी समुद्रजल निःक्षारीकरण प्रकल्पाला अखेर CRZ ची मंजुरी
4

मुंबईची तहान भागणार! समुद्राचे पाणी गोड होणार; मनोरी समुद्रजल निःक्षारीकरण प्रकल्पाला अखेर CRZ ची मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.