Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fake Police Robbery: ६० लाखांची रोकड कोठून आली अन् रचलं कोणी षडयंत्र? बनावट पोलीस लूट प्रकरणात मुंबई पोलिसांचा सखोल तपास सुरू!

Fake Police Robbery: "तुझ्याकडे काळा पैसा आहे!" बनावट पोलिसांचा डाव अन् परदेशी महिलेची ६० लाखांना लूट! आझाद मैदान पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेऊन रोकड जप्त केली; रकमेचा स्रोत आणि षडयंत्राचा तपास सुरू!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 23, 2026 | 12:36 PM
Fake Police Robbery: ६० लाखांची रोकड कोठून आली अन् रचलं कोणी षडयंत्र? बनावट पोलीस लूट प्रकरणात मुंबई पोलिसांचा सखोल तपास सुरू!

Fake Police Robbery: ६० लाखांची रोकड कोठून आली अन् रचलं कोणी षडयंत्र? बनावट पोलीस लूट प्रकरणात मुंबई पोलिसांचा सखोल तपास सुरू!

Follow Us
Follow Us:
  • बनावट पोलिसांनी परदेशी महिलेची टॅक्सी अडवून ६० लाखांची रोकड लुटली
  • आझाद मैदान पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेऊन रोकड जप्त केली
  • रकमेचा स्रोत आणि षडयंत्राचा तपास सुरू
Fake Police Robbery: दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमा परिसरात एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथे बनावट पोलिसांनी एका परदेशी महिलेला दिवसाढवळ्या लुटले आहे. लुटारूंनी महिलेकडून ६० लाख रुपयांची रोकड घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी टॅक्सी थांबवून ही लूट केली. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून लुटलेली रोकड जप्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: Road Robbery: रात्रीच्या अंधारात लुटमारीचा थरार अन् ‘पोलिस’ बनून वृद्धाची फसवणूक! पुण्यासह बारामतीत गुन्हेगारी टोळ्यांचा धुडगूस

“काळा पैसा” असल्याचा दावा करत बॅगा हिसकावल्या

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित परदेशी महिला बॅगेत ६० लाखांची रोकड घेऊन टॅक्सीने प्रवास करत होती. ती दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळून जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी तिची टॅक्सी अडवली. आरोपींनी आपण पोलीस असल्याचे भासवून महिलेकडे काळा पैसा असल्याचा दावा केला. त्यानंतर महिलेच्या दोन बॅगांमध्ये असलेली ६० लाख रुपयांची रोकड हिसकावून घेत दोघेही घटनास्थळावरून पसार झाले.

रोकड जप्त; परदेशी महिलेकडील रकमेचाही तपास सुरू

या घटनेची नोंद घेत आझाद मैदान पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आणि एका संशयिताला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयिताकडून लुटीची रोकड जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. दुसरीकडे, संबंधित परदेशी महिला एवढी मोठी रक्कम रोख स्वरूपात सोबत का बाळगत होती आणि ती रक्कम कोठून आली, याचाही सखोल तपास आझाद मैदान पोलिसांकडून सुरू आहे.

हेही वाचा: दहिहंडी उत्सवात पिस्तूल दाखवून दहशत माजवली, कंचीले टोळीला पोलिसांचा दणका; मकोका अंतर्गत कारवाई

जवळच्याच व्यक्तीच्या षडयंत्राचा संशय

या महिलेच्या जवळीलच कुणीतरी हे लुटीचे षडयंत्र रचले असावे, असा पोलिसांना दाट संशय आहे. कारण या महिलेच्या बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड असल्याची माहिती आधीपासूनच या दरोडेखोरांना होती. त्यामुळे त्यांनी पाठलाग करून ही लूट केल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दक्षिण मुंबईतील ही लूटमार घटना कोठे घडली?

    Ans: ही घटना दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमा परिसरात दिवसाढवळ्या घडली असून, या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तपास सुरू आहे.

  • Que: आरोपींनी परदेशी महिलेला कशाप्रकारे लुटले?

    Ans: दुचाकीवरून आलेल्या दोघांनी टॅक्सी अडवून आपण पोलीस असल्याचे भासवले आणि महिलेकडे काळा पैसा असल्याचा दावा करत दोन बॅगांमधील ६० लाख रुपयांची रोकड हिसकावून घेतली.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली आहे?

    Ans: आझाद मैदान पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याकडून लुटलेली रोकड जप्त केली आहे; तसेच या रकमेचा स्रोत आणि लुटीमागील षडयंत्राचा तपास सुरू आहे.

Web Title: South mumbai metro fake police rob foreign woman cash seized azad maidan police sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • Fake Police
  • Metro
  • Mumbai News

संबंधित बातम्या

BMC News : मुंबई महापालिकेत नेमकं चाललंय काय? किशोरी पेडणेकरांनी मंडपेश्वर भूखंडापासून टँकरपर्यंत सगळेच मुद्दे काढले!
1

BMC News : मुंबई महापालिकेत नेमकं चाललंय काय? किशोरी पेडणेकरांनी मंडपेश्वर भूखंडापासून टँकरपर्यंत सगळेच मुद्दे काढले!

Mumbai CNG Price: CNG दरवाढीने मुंबईकरांच्या खिशाला कात्री! आता रिक्षाने प्रवास करणंही महागणार?
2

Mumbai CNG Price: CNG दरवाढीने मुंबईकरांच्या खिशाला कात्री! आता रिक्षाने प्रवास करणंही महागणार?

मुंबईच्या समुद्रात राष्ट्रीय यॉटिंग स्पर्धेचा थरार! १७ क्लब, १२१ नौकानयनपटू सहभागी; विविध प्रकारांत इतरांनीही पटकावली विजेतेपदे
3

मुंबईच्या समुद्रात राष्ट्रीय यॉटिंग स्पर्धेचा थरार! १७ क्लब, १२१ नौकानयनपटू सहभागी; विविध प्रकारांत इतरांनीही पटकावली विजेतेपदे

Kurla Garden Incident : कुर्ला मारहाण प्रकरणात मोठी अपडेट! तरुण-तरुणीला मारणाऱ्या ६ अल्पवयीन मुलांबाबत कोर्टाचा निर्णय
4

Kurla Garden Incident : कुर्ला मारहाण प्रकरणात मोठी अपडेट! तरुण-तरुणीला मारणाऱ्या ६ अल्पवयीन मुलांबाबत कोर्टाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.