आगामी निवडणुकीत यश मिळवण्यासाठी ठाकरे गटाची धडपड; पंकज भोयरांची खोचक टीका
Gondia News: राज्यभरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महायुतीतील काही मंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी करत सोमवारी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनावर टीका करताना राज्याचे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला.
भोयर म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही यश मिळवता येईल का, यासाठी अशा प्रकारची आंदोलने केली जात आहेत. मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली देशात विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. त्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाकडून वारंवार खोटे आरोप केले जातात.”
शेअर बाजाराला हरित झळाळी! सेन्सेक्स ७४६ अंकांनी वधारला, निफ्टीने गाठला नवा टप्पा
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी अलीकडेच निवडणूक प्रक्रियेत ‘वोट चोरी’ झाल्याचा आरोप केला होता. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या वतीने राज्यभर आंदोलन होत आहे. या संदर्भात विचारणा केल्यावर पंकज भोयर म्हणाले, “भाजपचे कार्यकर्ते केंद्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवत आहेत. त्यामुळे लोकांचा कल भारतीय जनता पक्षाकडे वाढत आहे. या वाढत्या लोकप्रियतेवर पडदा टाकण्यासाठी राहुल गांधी अशा प्रकारची विधाने करतात.”
मुंबईतील कल्याण-डोंबिवली भागात १५ ऑगस्टला मांसाहार विक्रीवरील बंदीबाबत जितेंद्र आव्हाड यांनी “मी त्या दिवशी मटन पार्टी करणार” असे विधान केले होते. या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत भोयर म्हणाले, “हजारो लोकांच्या बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. स्वातंत्र्यदिनासारख्या पवित्र दिवशी अशा प्रकारचे वक्तव्य करून आव्हाड यांनी त्यांच्या वैचारिक पातळीचे दर्शन घडवले आहे.”
Mira Bhayandar Crime : धक्कादायक! 12 वर्षीय मुलीवर 200 जणांकडून लैंगिक अत्याचार, मानवी तस्करीचे
अलीकडेच काही वृत्तपत्रांमध्ये ‘राज्यमंत्र्यांना विशिष्ट अधिकार देण्याची मागणी’ केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या संदर्भात विचारले असता, “राज्यमंत्र्यांचे कोणतेही शिष्टमंडळ मुख्यमंत्री यांना भेटलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सर्व आवश्यक अधिकार दिल्याचे भोयर यांनी स्पष्ट केले.