धक्कादायक! 12 वर्षीय मुलीवर 200 जणांकडून लैंगिक अत्याचार, मानवी तस्करीचे क्रूर वास्तव (फोटो सौजन्य-X)
Mira Bhayandar Crime News in Marathi : गेल्या काही महिन्यापासून महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटनेत वाढ होत आहे.अशातच आता मीरा भाईंदरमधून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. इथे एका 12 वर्षीय मुलीचे तब्बल 200 हून अधिक नराधमांनी लचके तोडले आहेत. मागील कित्येक महिन्यांपासून पीडित मुलगी अत्याचार सहन करत होती. ती मुलगी मानवी तस्करीच्या एका मोठ्या जाळ्यात अडकली. तीन महिन्यांच्या काळात तब्बल 200 हून अधिक पुरुषांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
मुंबईतील वसई विरार भागात मानवी तस्करी आणि सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यातून समोर आलेली माहिती धक्कादायक असून, एका १२ वर्षीय बांगलादेशी मुलीला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आल्याचा भयंकर घटना उघडकीस आली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागानं नायगावमध्ये एनजीओच्या मदतीनं एका १२ वर्षीय मुलीची सुटका केलीय. त्यानंतर मुलीनं सांगितलेली घटना हादरवणारी आहे.
याबद्दल माहिती मिळाल्यानंतर वसई विरार पोलिसांनी मीरा भाईंदर, मानव तस्करी विरोधी पथक आणि स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने मोठी कारवाई केली. आतापर्यंत या प्रकरणात ९ जणांना अटक करण्यात आली आहे. अतर अल्पवयीन पीडितेला एनजीओकडे सोपवलं आहे. एनजीओकडे अल्पवयीन मुलीनं सांगितलेली घटना भयानक अशी आहे. तीन महिन्यात तिच्यावर २०० पेक्षा अधिक पुरुषांनी लैंगिक अत्याचार केले आहेत.
26 जुलै रोजी दोन स्वयंसेवी संस्था ‘एक्झोडस रोड इंडिया फाउंडेशन’ आणि ‘हार्मोनी फाउंडेशन’ यांच्या मदतीने मीरा-भाईंदरच्या मानव तस्करी विरोधी पथकाने वसईजवळच्या नायगाव येथे संयुक्त कारवाई केली. नायगाव (पूर्व) येथील एका इमारतीवर छापा टाकून पोलिसांनी 12 वर्षीय पीडित मुलगी आणि एका 20 वर्षीय महिलेची सुटका केली. याचवेळी, मोहम्मद खालिद बापरी, जुबेर शेख आणि शमीन सरदार या तीन बांगलादेशी आरोपींना अटक करण्यात आली.
याप्रकरणी एनजीओने म्हटले की पीडिता शाळकरी मुलगी असून एका विषयात नापास झाल्यानंतर घरचे मारतील या भीतीने घर सोडलं. त्यानंतर एका अनोळखी महिलेने तिला कोलकात्यात आणलं. बनावट कागदपत्रांच्या आधारे गुजरातमधील नाडियाड येथे नेल.तिथं वृद्ध व्यक्तीनं अत्याचार करत अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल केलं. त्यानंतर मुलीला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलं.
१२ वर्षांची मुलगी मुंबईत गेली आणि तिच्यावर अनेक ठिकाणी गंभीर अत्याचार झाले. वेश्याव्यवसायाच्या दलदलीत तिचं बालपण चिरडून टाकण्यात आले.या घटनेनंतर एनजीओ आणि पोलिसांनी तिची सुटका करून बाल कल्याण समितीकडे चिमुकलीला सोपवण्यात आलंय. सध्या तिचं समुपदेशन करण्यात येत आहे. घर सोडल्यानंतर चिमुकली महिकाडेला कशी पोहोचली, ती भारतात कुठे आली आणि कुठे राहिली? याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात अडकलेल्यांमध्ये २ महिला आणि ७ पुरुष दलाल आहेत. या घटनेनंतर कडक कारवाईची मागणी सर्वत्र होत आहे.