Thackeray group aambadas danve write open letter to shivsainik on Shivsena vardhapan din 2025
Shivsena Politics News In Marathi: संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. अहिल्यानगर शहरातील शिवसेना ठाकरे पक्षातील माजी नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित झाला आहे. असे असताना त्यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रयत्न केला. पण त्यात त्यांना काही यश आले नाही. पण शिंदेंच्या शिवसेनेत चाललेल्या माजी नगरसेवकांनी अंबादास दानवे यांनाच,’साहेब. तुम्हीही आमच्यासोबत चला, अशी ऑफर दिल्याची माहिती समोर आली. दरम्यान दानवेंसोबत झालेल्या बैठकीत असलेल्या माजी नगरसेवकांनी या माहितीला दुजोरा दिला.
याचपार्श्वभूमीवर, जुना काळ गेला आता ‘जय भवानी जय शिवाजी बोलायचं आणि मत मिळवायची दिवस गेले.’ असा अजब सल्ला विधानपरिषदेचे विरोधी पक्षानेते ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी कर्जत येथे झालेल्या संवाद मेळाव्यात शिवसैनिकांना दिला.असून शिवसेनेची जुनी ओळख पुसून काही तरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न होतोय का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे मंगळवारी (28 जानेवारी) सायंकाळी ठाकरेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. विधानसभेच्या निवडणुकीत पराभावांनंतर कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण व्हावे यासाठी या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या संवाद मेळाव्यासाठी विधापरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
यावेळी अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना अनेक कानामंत्र दिले. पण बोलण्याच्या ओघात शिवसेनेची खरी ओळख असणारे घोषवाक्य म्हणजे ‘ जय शिवाजी, जय भवानी ‘ याबाबत अजब वक्तव्य केले असून आता जय शिवाजी जय भवानी बोलून मते घ्यायचे दिवस गेले असे सांगितले. यावरून ठाकरेंची शिवसेना आता बदलली आहे हे कुठे तरी अधोरेखित होताना दिसत असून शिवसेनेची जुनी ओळख पुसून काही तरी नावीण्य आणण्याचा प्रयत्न होतोय का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले. महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या राज्यात ५७ जागा जिंकल्या. तर संपूर्ण महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडाला. राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला २० जागा मिळाल्या. महायुतीच्या सत्तेत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले असून, त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्ष विस्ताराचे धोरण ठरवले आहे.
राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षातून चांगलीच गळती लागली आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेयांनी ज्यांना जायचे असेल, त्यांनी खुशाल जावं, असे म्हटले आहे. असे असले तरी या शिवसैनिकांना रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांकडून प्रयत्न होत आहे. अहिल्यानगर शहरातील शिवसेना ठाकरे पक्षातील माजी नगरसेवकांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पुढील दोन दिवसांत प्रवेश होत आहे.
या पक्षाच्या प्रवेशानंतर अहिल्यानगरमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाचे वर्चस्व आहे. हे सर्व माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत निघून गेल्यावर शिवसेना ठाकरे पक्ष संपूर्ण रिकामा होईल. या माजी नगरसेवकांना रोखण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट घेतली.