Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Borivali Twin Tunnel : ठाणे, बोरिवलीतील वाहतूक कोंडी दूर होणार! २०२८ पर्यंत ट्विन टनल सेवेत दाखल होणार

मुंबईतील दोन मोठ्या उपनगरांना जोडणारा ठाणे-बोरीवली ट्विन टनेल प्रकल्प वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे ते बोरीवली प्रवास अवघ्या 12 मिनिटांत शक्य होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 15, 2025 | 02:09 PM
ठाणे, बोरिवलीतील वाहतूक कोंडी दूर होणार! २०२८ पर्यंत ट्विन टनल सेवेत दोखल होणार

ठाणे, बोरिवलीतील वाहतूक कोंडी दूर होणार! २०२८ पर्यंत ट्विन टनल सेवेत दोखल होणार

Follow Us
Close
Follow Us:
  • ठाणे-बोरीवली ट्विन टनेल प्रकल्प
  • ठाणे ते बोरीवली प्रवास अवघ्या 12 मिनिटांत शक्य
  • पहिल्या टीबीएमचे नाव ‘नायक’ आहे
मुंबई : ठाणे – बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाअंतर्गत ठाण्याच्या लॉन्चिंग शाफ्ट येथे ‘नायक’ नावाच्या टनेल बोअरिंग मशीनच्या (टीबीएम) जोडणीचे काम सुरू आहे. टीबीएमची जोडणी पूर्ण करून मार्च २०२६ मध्ये ठाण्याकडून बोरिवलीच्या दिशेने भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन आहे. या दुहेरी बोगद्याचे काम में २०२८ पर्यंत दाखल करण्यात येणार आहे. हा बोगदा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास हे अंतर केवळ १२ मिनिटांत पार करता येणार आहे.

बोरिवली–ठाणे दुहेरी भुयारी रस्ता प्रकल्पाला वेग; प्रकल्पासाठी बाधित कुटुंबियांना MMRDA चे तीन पर्याय 

दोन टीबीएम मशीन मुंबईत दाखल

दुहेरी बोगद्याच्या कामासाठी चार टीबीएम यंत्रांचा वापर करण्यात येणार असून या टीबीएमची बांधणी चेन्नईतील ‘हेरेनकनेट कंपनीत केली जात आहे. यापैकी दोन टीबीएम मुंबईत दाखल झाले असून पहिल्या टीबीएमचे नाव ‘नायक’ आहे. नायक’ टीबीएम ठाण्यातून बोरिवलीच्या दिशेने भुयारीकरण करणार आहे. या टीबीएमच्या जोडणीचे काम सध्या ठाणे लॉन्चिंग शाफ्ट येथे सुरू आहे.

दुसऱ्या टीबीएमचे नाव ‘अर्जुन’

जोडणी पूर्ण करून मार्च २०२६ मध्ये भुवारीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. अंदाजे ११० सुट्ट्या भागांमध्ये टीबीएम आणण्यात आले असून सुझ्या भागांची जोडणी झाल्यानंतर ते भूगर्भात सोडण्यात येणार आहेत. दुसऱ्या टीबीएमचे नाव ‘अर्जुन’ असून हे टीबीएम बोरिवलीच्या लॉन्चिंग शाफ्टमध्ये सोडण्यात येणार आहे.

१८ हजार कोटी रुपये खर्च

बोरिवली आणि ठाणे प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी एमएमआरडीएने एकूण सहा मार्गिकांचा ११.८ किमी लांबीचा ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला. यात १०.२५ किमी लांबीचे दोन बोगदे असणार असून हे बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहेत.
हा प्रकल्पासाठी अंदाजे १८ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा प्रकल्प पूर्ण होऊन प्रवासी वाहतुकीस खुला झाल्यास ठाणे बोरिवली अंतर केवळ १२ मिनिटांत पार करता येणार आहे. यामुळे ठाणे, बोरिवलीतील वाहतूक कोंडी दूर होणार आहे.

ठाणे-बोरीवली टनेल प्रकल्पाला आमचा विरोध नाही

प्रत्येक टनेलमध्ये 3 लेन असतील आणि तो 23 मीटर खोलीवरून जाईल. तसेच या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीचा मोठा भार कमी होणार आहे. सध्या ठाणे ते बोरीवली हा 23 किमीचा प्रवास सुमारे 1 तासाहून अधिक वेळ घेतो. मात्र, टनेल पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या 12 किमीवर येईल आणि केवळ 15 मिनिटांत शक्य होईल.घोडबंदर रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल. प्रवासी कमी वेळेत आणि अधिक सोयीस्करपणे प्रवास करू शकणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ठाणे बोरिवली कॉरिडॉर म्हणजे काय?

    Ans: ठाणे-बोरिवली प्रकल्पात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) खाली ११.८ किमी लांबीचे दोन समांतर तीन-लेन बोगदे बांधण्याचा समावेश आहे. एकदा हे बोगदे पूर्ण झाल्यावर, घोडबंदर रोडला पश्चिम द्रुतगती महामार्गाशी जोडतील, ज्यामुळे सध्याचा ६० ते ९० मिनिटांचा प्रवास सुमारे १५ मिनिटांवर येईल.

  • Que: ठाणे आणि बोरिवली दरम्यानचा पॅकेज २ बोगदा कोणता आहे?

    Ans: पॅकेज २ अंतर्गत, ठाणे आणि बोरिवली दरम्यान ६.५ किमी लांबीचा बोगदा बांधला जाईल . पॅकेज ३ मध्ये मार्गावर वायुवीजन प्रणाली आणि इतर उपकरणे बसवण्यात येतील. एमएमआरडीएने हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

  • Que: २०२५ मध्ये भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता असेल?

    Ans: पातालपाणी रेल्वे बोगदा (१४ किमी) भारतात जगातील सर्वात लांब रेल्वे बोगद्यांपैकी एक आहे. २०२५ मध्ये कार्यान्वित होण्यासाठी सज्ज असलेला, पातालपाणी रेल्वे बोगदा ४९ किमी लांबीचा आहे आणि तो भारताच्या मध्यभागी, मध्य प्रदेशात स्थित आहे. 

Web Title: Thane borivali twin tunnel traffic congestion in thane and borivali will be relieved the twin tunnel is expected to be operational by 2028

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 02:08 PM

Topics:  

  • maharashtra
  • MMRDA

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News : मिरा–भाईंदरमधील विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना सुलभ सेवा
1

Mira Bhayandar News : मिरा–भाईंदरमधील विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना सुलभ सेवा

Mahalaxmi Race Course : “महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क”, एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
2

Mahalaxmi Race Course : “महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क”, एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

Pune Book Festival : पुस्तकांची कोट्यवधींची उलाढाल; दोन दिवसांतच दीड लाखांहून अधिक जणांची भेट
3

Pune Book Festival : पुस्तकांची कोट्यवधींची उलाढाल; दोन दिवसांतच दीड लाखांहून अधिक जणांची भेट

CM Devendra Fadnavis: ‘मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार…’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत स्पष्टच सांगितले
4

CM Devendra Fadnavis: ‘मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार…’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत स्पष्टच सांगितले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.