ठाणे: ठाणे-बोरीवली टनेल प्रकल्पाला विरोध नाही, मात्र नागरिकांच्या काही महत्त्वाच्या मागण्या आहेत, असे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले. शनिवारी एमएमआरडीएच्या वतीने आयोजित बैठकीत स्थानिक रहिवासी, अधिकारी, ठेकेदार आणि म्हस्के यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. रहिवाशांनी टोल नाका पुढे हलवावा, अॅप्रोच रस्ता युनी अॅबेक्स कंपनीपर्यंत पूर्वीप्रमाणे ठेवावा आणि वृक्षतोड थांबवावी अशा मागण्या मांडल्या.खासदार म्हस्के यांनी सुचवले की, प्रत्येक सोसायटीमधून प्रतिनिधी घेऊन एक कमिटी तयार करावी व त्याद्वारे एमएमआरडीएशी संपर्क साधावा. एमएमआरडीएचे सीईओ विशाल जांभळे यांनी टनेलचे काम ९२ मीटर पुढे नेण्यात आले असून, नष्ट झालेल्या २५०० मीटर हरित पट्ट्याच्या बदल्यात ५३०० मीटर नव्याने विकसित केला जाईल असे सांगितले. रहिवाशांनी ध्वनी व धुळीच्या प्रदूषणावर चिंता व्यक्त केली. यावर ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना म्हस्के यांनी दिली. नागरिकांच्या मागण्या अभ्यासून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.